नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास सरकार कटीबद्द- शिरोडकर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

बांधकामाचा शुभारंभ करताना आमदार सुभाष शिरोडकर, सुनील सावकर, मिनानाथ उपाध्ये, फिलोमिना वाझ, विश्‍वंभर देसाई व अन्य मान्‍यवर.

सुभाष शिरोडकर : शिरशिरे- बोरीत संरक्षक भिंत कामाचे उद्‍घाटन

बोरी : ग्रामिण परिसरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्ते, वीज, पाणी, त्‍याचबरोबर नाला सरंक्षक भिंती बांधून देण्याचे काम अग्रक्रमाने चालू आहे. शासनाच्या योजना नगारिकांच्या घरापर्यंत पोहोचल्‍या जातील, असे प्रतिपादन आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले.

कृपानगर शिरशिरे - बोरी येथे शासनाच्या योजनेतंर्गत सुमारे १२ लाख रुपये खर्चाची योजना असून या परिसरात बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीच्या पायाभरणी समारंभप्रसंगी आमदार श्री. शिरोडकर हे बोलत होते. याप्रसंगी बोरी पंचायतीचे उपसरपंच सुनील सावकर, प्रा. मिनानाथ उपाध्ये, पंचसदस्य कमलाकांत गावडे, फिलोमिना वाझ, विश्‍वंभर देवारी आदी मान्यवरांबरोबर शासकीय अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.

या प्रसंगी उपसरपंच सुनील सावकर यांचे भाषण झाले. आमदार सुभाष शिरोडकर यांच्या कारकिर्दीत बोरी गावात विकासकामे झाली आहेत व यापुढेही होणार आहेत असे सावकर म्हणाले. प्रा. मिनानाथ उपाध्ये भाजप शासनाच्या कार्याचे कौतुक करणारे भाषण झाले. श्री. शिरोडकर यांच्या हस्ते विधिवत भूमीपूजन करून आणि श्रीफळ वाढवून संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सुनील सावकर यांनी स्वागत, तर फिलोमिना वाझ यांनी आभारप्रकटन केले.

 

पडीक देवस्थानांचा वारसा जतन व्हायला हवाः मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत

संबंधित बातम्या