राज्यपालांची दखल अधिकाऱ्यांची धावपळ 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पणजी: गोवा राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजभवनावर विशेष बैठक बोलावून व्याघ्र हत्याप्रकरणाचा आढावा घेतला.यावेळी मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत ,मुख्य सचिव परिमल राय ,प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक आदी विशेष बैठकित उपस्थित होते.सत्तरी तालुक्यातील गोळवली येथे हत्या हल्याचा विषय सध्या राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.दुभत्या जनावरांचा वाघाने हल्ला करून त्यांना ठार मारले.या हत्याची वन खात्याकडे तक्रार करूनही भरपाई मिळाली नाही.त्यातच आणखी एका वाघाने दुभत्या जनावराचा बळी घेतला.त्याही प्रकरणी वन खात्याची कारवाई पंचनाम्यापलीकडे पुढे न सरकल्याने वाघ

पणजी: गोवा राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजभवनावर विशेष बैठक बोलावून व्याघ्र हत्याप्रकरणाचा आढावा घेतला.यावेळी मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत ,मुख्य सचिव परिमल राय ,प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक आदी विशेष बैठकित उपस्थित होते.सत्तरी तालुक्यातील गोळवली येथे हत्या हल्याचा विषय सध्या राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.दुभत्या जनावरांचा वाघाने हल्ला करून त्यांना ठार मारले.या हत्याची वन खात्याकडे तक्रार करूनही भरपाई मिळाली नाही.त्यातच आणखी एका वाघाने दुभत्या जनावराचा बळी घेतला.त्याही प्रकरणी वन खात्याची कारवाई पंचनाम्यापलीकडे पुढे न सरकल्याने वाघ मारले आहे असे चित्र चर्चेत आहे.याची माहिती राज्यपालांना मिळताच त्यांनी आज राजभवनावर सर्वांना पाचारण केले.व याची सगळी माहिती जाणून घेतली.राज्यपालांनी बैठक बोलावल्यानंतर उपजिल्हाधिकारी व उपवनसंरक्षकांनी गोळवळीत धाव घेतली व संबंधित पावणे कुटुंबियांना मुख्यमंत्री मदतनिधीतून मदतीचे वाटप केले.प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. 
राज्य पर्यावरण संरक्षण मंडळाची बैठक उशिराने घेतलेल्या चिडलेल्या राज्यपालांनी आजच्या बैठकीतही तसाच सूर आळवला,अशी माहिती मिळाली आहे.वाघाने केलेल्या हल्यात ज्यांच्या जनावरांचा बळी गेला आहे.त्यांना नुकसानभरपाई देण्याविषयी काय ठरले आहे,तसेच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्यासंबंधी माहिती राज्यपालांना देण्यात आली.मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील वाद कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपायांची माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली.राज्यपालांनी यावेळी अनेक प्रश्न विचारले. 
"९० टक्के कर्जबाजारी ‘खाण’ संबंधित"

संबंधित बातम्या