चंद्रकांत गावस यांना राज्यपालांच्या हस्ते पदक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पर्वरी: पर्वरी पोलिस स्थानकात उपनिरीक्षक म्‍हणून कार्यरत असलेले चंद्रकांत गावस यांना यंदा राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते प्रशिक्षण काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदान केलेले पदक प्राप्त झाले आहे.

चंद्रकांत गावस यांनी २००६ साली एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले असून त्‍यानंतर ते गोवा पोलिस दलामध्ये रुजू झाले. आपल्या चौदा वर्षाच्या सेवेत त्यांनी पणजी, म्हापसा, हणजूण आणि वाळपई येथील पोलिस ठाण्यात उत्तम कामगिरी केली असून सध्या ते पर्वरी पोलिस स्थानकात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.पर्वरीतील गुन्हेगारी विश्वात त्यांचा दबदबा असून अनेक प्रकरणात त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.त्यांना मिळालेल्या पदकामुळे त्यांचे सहकारी तसेच पोलिस दलाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.  

संबंधित बातम्या