इएसआय इस्पितळ राज्य सरकारच्या ताब्यात: कामगारमंत्र्यांची घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मडगाव: मडगावमधील १०० खाटांच्या क्षमतेचे राज्य कर्मचारी विमा महामंडळ (इएसआय) इस्पितळ राज्य सरकारच्या कर्मचारी विमा महामंडळाच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. महसूल व कामगार मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी आज यासंबंधी घोषणा केली.हे इस्पितळ गोवा राज्य कर्मचारी विमा महमंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या ताब्यात देण्यास नवी दिल्लीच्या राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती मोन्सेरात यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर दिली आहे.

मोन्सेरात यांनी तीन महिन्यांपूर्वी इएसआय इस्पितळाला भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला होता.विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर हे इस्पितळ राज्य सरकारच्या विमा महामंडळाच्या ताब्यात घेण्यास मंजुरी मागण्याचा निर्णय झाला होता,असे ट्वीट मोन्सेरात यांनी केले आहे.
राज्यातील सर्वोत्कृष्ट इस्पितळापैकी एक होण्याची इएसआय इस्पितळाची क्षमता आहे. राज्य सरकारच्या विमा महामंडळाकडे सोपण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दक्षिण गोव्यातील आरोग्य सेवा सदृढ होणार आहे, असा विश्वास मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे.
 
संबंधित बातम्या