काणकोणात फुलोत्पादकांना लाखोंचे नुकसान

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

काणकोण मधील फुले बंगळूर, पूणे व मुंबई बाजारात पाठवण्यात येत होती.

सुभाष महाले

काणकोण

 काणकोण मधील ऑर्कीड फुल उत्पादकाची कोविड १९ टाळेबंदीमुळे गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असल्याने महिन्याकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे पणसुले-काणकोण येथील एक फुल उत्पादक विशाल देसाई यांनी सांगितले. पावसाळ्यात या फुलाचे उत्पादन होत नाही.नोव्हेंबर महिन्यापासून फुल उत्पादनला सुरूवात होते. काणकोण मधील फुले बंगळूर, पूणे व मुंबई बाजारात पाठवण्यात येत होती.फुलाच्या वाढीसाठी किटकनाशके, खत,बुरशीरोधक औषधाची नियमीत मात्रा द्यावी लागते त्यासाठी हजारो रूपयाचा खर्च येतो.पहिल्यांदा सरकारने अनुदान देण्यास विलंब केल्याने उत्पादक हवालदिल झाले होते त्यात करोनाचे संकट आले असल्याने फुल उत्पादकाचे कंबरडेच मोडले आहे.काणकोणात सध्या सात पॉलिहाऊस मधून ऑर्कीडच्या फुलाचे उत्पादन घेतले जाते त्याचीही हीच परिस्थिती आहे.सर्वाचे मिळून सुमारे दहा लाख रूपयापेक्षा जास्त किमंतीची फुले पडून आहेत. टाळेबंदीचे समर्थन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी टाळेेबंदी अनिवार्य आहे.मात्र सरकारने  फुल उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना या आर्थिक संकटावेळी शक्य तकऱ्याना दिलासा देण्याची गरज देसाई यांनी व्यक्त केली.सद्या फुले काढणीसाठी तयार झाली आहेत मात्र सद्या समारंभ, लग्ने व अन्य कार्यक्रम होत नसल्याने फुलाची काढणी करून करणार काय हा प्रश्न आहे.

 

 

 

संबंधित बातम्या