वेल्डर्सची कमतरता   

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पणजी:‘वेल्डिंग’ क्षेत्रात युवकांना मोठी संधी
आयआयडब्ल्यू संघटनेचे मत; जागतिक दर्जाच्या ‘वेल्डिंग’ प्रशिक्षणाची गरज
राज्यात जोडाऱ्यांची (वेल्डर) उणीव भासत असल्याचे गोवा शिपयार्डचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे म्हणणे आहे. शिपयार्डला ३५ हजार कोटी रुपयांची कामे संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्यावर त्यांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.आता त्यांच्या या म्हणण्यावर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंगने (आयआयडब्ल्यू) शिक्कामोर्तब केले आहे.

संघटनेने म्हटले आहे, की देशात कुशल जोडारींची कमतरता जाणवत असल्याने अनेक पायाभूत योजनांचे कंत्राटदार चीन, रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमधील वेल्डिंग आणि कटिंग परिचालकांचा (ऑपरेटर्स) वापर करून घेत आहेत.पायाभूत सुविधांमधील रस्ते, रेल्वे आणि पूल, ऊर्जा आणि शिपिंग अशा सर्वच प्रकल्पांमध्ये उच्च प्रतीची सुयोग्य धातू जोडणी तंत्रज्ञानाची गरज भासते.हे काम केवळ प्रशिक्षित आणि प्रमाणपत्रधारक मनुष्यबळाकडूनच यशस्वीरीत्या पूर्ण केले जाऊ शकते.त्या क्षेत्रात युवकांना मोठी संधी सध्या आहे.वेल्डर्स, कटर्स, फिटर्स, यंत्रचालक, अभियंते आणि निरीक्षक यांच्यासकट १.२ दशलक्ष व्यावसायिकांची कमतरता असल्याचा अंदाज या संघटनेने वर्तवला आहे.रस्ते, रेल्वे, पूल, अंतर्गत जलमार्ग आणि ऊर्जा यासकट पायाभूत विकासामध्ये पुढील ५ वर्षांसाठी नियोजीत शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बघता कौशल्य विकास मंत्रालयाने देशात जागतिक दर्जाच्या वेल्डिंग प्रशिक्षणाची सुरवात आणि प्रसार करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.

आगारवाडा पंचायत क्षेत्रातील बेकायदा फलक हटवले

प्रमाणपत्रधारक ‘वेल्डरां’ना मिळणारे वेतन हे अतिशय चांगले आहे. त्यांना ३ लाख रुपयांपासून ते ४० लाख
रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळते. अनेक उद्योगांना त्यांच्या भांडवली गुंतवणुकीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असल्याने जुन्या आणि झिजलेल्या उपकरणांना पुन्हा नवे रूप देण्याची क्षमता असलेल्या वेल्डर्सवर ते अवलंबून असतात. अशी कौशल्ये अभावानेच
आढळतात आणि त्यांना खूप मागणी आहे. जर तुम्ही वेल्डिंग उद्योगात स्वत:ला वाहून घेतले तर तुमच्यावर रोजगाराशिवाय राहण्याची वेळ कधीच येणार नाही.
- कमल शहा, अध्यक्ष (मुंबई शाखा, आयआयडब्ल्यू)

संबंधित बातम्या