हरमल किनाऱ्यावर लमाणी लोकांचा वाढता वावर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

हरमल:फुटपाथवर अतिक्रमणे केल्याने स्थानिकांना व्यवसायावर परिणाम

येथील किनारी भागांत पर्यटन हंगाम प्रारंभ झाला असून, लमाणी लोकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. फुटपाथवर अतिक्रमणे वाढल्याने यावर नियंत्रण आणण्याचे काम पंचायतीने पोलिसांच्या मदतीने करावे, अशी मागणी उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस प्रमेश मयेकर यांनी केली आहे.

हरमल:फुटपाथवर अतिक्रमणे केल्याने स्थानिकांना व्यवसायावर परिणाम

येथील किनारी भागांत पर्यटन हंगाम प्रारंभ झाला असून, लमाणी लोकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. फुटपाथवर अतिक्रमणे वाढल्याने यावर नियंत्रण आणण्याचे काम पंचायतीने पोलिसांच्या मदतीने करावे, अशी मागणी उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस प्रमेश मयेकर यांनी केली आहे.

लमाण्याचा संख्येत वाढ.
अलीकडच्या काळात लमाणी लोकांची संख्या बरीच वाढली आहे त्यामागे अनेक कारणे असली तरी लमाणी इथल्या स्थानिक लोकांची नावे सांगून पोलिसांची कारवाई टाळत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. स्थानिक लोकांशी संवाद साधल्यास त्यांचा असल्या कामासाठी कदापिही पाठिंबा नसतो.पोलिसांनी कारवाई करावी असे त्यांचे म्हणणे असते.प्रत्येक धंद्यात त्यांचा शिरकाव अलीकडे कित्येकांना खुपत असून, ना हरकत दाखल्याची चौकशी करूनच त्यांना आश्रय देण्यात यावा, अशी मागणी मयेकर यांनी केली आहे.

समुद्रकिनारा आंदण ठरू नये.
सद्यःस्थितीत समुद्र किनारा लमाणी लोकांसाठी आंदण ठरत आहे.परंतु पंचायतीने अलीकडे घेतलेल्या ठरावामुळे किनारा ‘लमाणी मुक्त' असेल असे समजते.सध्या लमाणी बाया व त्यांची मुलं, किनाऱ्यावर धुडगूस घालीत असून त्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसल्याचे समाजकार्यकर्ते मयेकर यांनी सांगितले. लमाण्याच्या वावरामुळे किनाऱ्यावर पर्यटकांना स्वातंत्र्य मिळत नसल्याने पर्यटक तीव्र नाराजी व्यक्त करतात.लमाणी लोक किनारा स्वतःचा असल्यागत वावरत असून किनाऱ्याची रया घालवण्याचे काम लमाण्यांनी केल्याचा दावा मयेकर यांनी केला आहे.

नदी परिवहनचा ‘पाय’ खोलात

पर्यटन विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष.

किनारी भागात सध्या पर्यटन विभागाचे व पेडणे पोलिस ठाण्याचे कर्मचारी सेवा देतात.या ठिकाणी ड्युटीसाठी वरिष्ठांना खुश करावे लागते.ह्या किनाऱ्यार ड्युटीसाठी पोलिसांत ‘बोली’ची चलती आहे, असे ऐकिवात आहे.पर्यटन विभागात तर दरवर्षी अमुकच पोलिस निर्धास्तपणे वसुली करून अदृश्य होत असतो. त्यामुळे ‘त्या’ पोलिसांमुळे पोलिस विभागात नाराजी दिसून येते.पोलिसांच्या वरदहस्तामुळे लमाणी शेफारलेले आहेत. परंतु जर का मलिदा न मिळाला तर संबंधित म्होरक्यांना बोलावून घेत असल्याचे समजते.पोलिस प्रत्येकवेळी सेटिंग करताना, सकाळी एक राऊंड किनाऱ्यावर असतो व त्यानंतर संध्याकाळी असे फक्त दोन राऊंडसाठी पोलिस असतात.पोलिस गेल्यानंतर म्हणजेच दुपारी अकरानंतर किनाऱ्यावर लमाण्यांचे राज्य असते. हेच सेटिंग पर्यटकांना व व्यावसायिकांना महागात पडत असते, हे नक्की.

लमाण्यांना हुसकावून लावण्याची मागणी...
लमाण्याच्या वाढत्या उपद्रवामुळे पर्यटक कमी संख्येने फिरकत असतात.त्याचा विपरित परिणाम व्यवसायावर होत असल्याने व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.लमाण्यांना हुसकावून लावल्याशिवाय पर्यटन हंगाम सुरळीत होऊ शकत नाही.त्याचा वावर व उद्धटगीरीची प्रकरणे वाढली असून, त्यांना रस्त्यानजिकच्या दुकानापुरते सीमित करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.दुकानात दोन-चार जण व किनाऱ्यावर दोनचार जणी मिळून करणारा हा व्यवसाय लमाण्याच्या वावरामुळे अधोगतीला जात आहे, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

हसापूर पूल जीर्ण​
पंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष्य
गत ग्रामसभेत लमाण्याचा विषय पुन्हा गाजला.लमाण्याच्या उपद्‍व्यापमुळे पर्यटक संख्या रोडावली आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर पंच सदस्य इनासियो डिसौझा यांनी सरपंचाच्यावतीने आठ दिवसांत लमाणी किनाऱ्यार दिसणार नाहीत, असे आश्वासन दिले होते.सध्या लमाणी लोक स्थानिक नागरिकांशी उद्धटपणे वागत असून, भविष्यात स्थानिकांच्या रोषास पोलिसांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, पंचायतीच्या भूमिकेकडे व्यावसायिकांचे डोळे लागून राहिले आहे.तरी पंचायतीचे सरपंच व मंडळाने ग्रामसभेतील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पावले उचलावीत व परप्रांतीय लोकांची दादागिरी व उद्घाटगीरी संपुष्टात आणावी अशी मागणी सर्व थरांतून केली जात आहे.

संबंधित बातम्या