सीएमएम अरेनामध्ये 'गुढीपाडवा विशेष' सेल

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

सीएमएम अरेना या गोव्यातील सर्वात भव्य लाईफस्टाईल मॉलमध्ये 'गुढीपाडवा विशेष' सेल होणार आहे. ता. ४ पासून या प्रदर्शन विक्रीला प्रारंभ होईल.

मेरशी (गोवा) : सीएमएम अरेना या गोव्यातील सर्वात भव्य लाईफस्टाईल मॉलमध्ये 'गुढीपाडवा विशेष' सेल होणार आहे. ता. ४ पासून या प्रदर्शन विक्रीला प्रारंभ होईल. मूळ किमतीच्या ५०% इतक्या किमतीत विविध फर्निचर विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. सोफा सेट, रिक्लायनर, डायनिंग सेट, बेडरुम सेट, फर्निशिंग, होम डेकॉर, मॅट्रेसेस, अप्लायन्सेस आणि गृहसजावटीच्या अनेक गोष्टी सवलतीच्या किमतीत उपलब्ध राहणार आहेत.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी केलेली खरेदी ही घरात, कार्यालयात भाग्य आणते, असा संकेत आहे. त्यामुळे आपल्या घर-कार्यालय वा अन्य आस्थापनाची सजावट बदवलायचा विचार असेल किंवा नवीन घराची वाजवी किमतीत सजावट करावयाची असल्यास सीएमएम अरेना गुढीपाडवा सेलला भेट देणे हितावह ठरणार आहे. गोव्यासाठी गेली अनेक दशके विविध सेवा देणाऱ्या सीएमएम समुहाचा हा एक महत्त्वाचा उद्योग असून गेल्या काही वर्षात सीएमएम अरेनाने गोमंतकिय तसेच इतर राज्यातील ग्राहकांमध्ये विश्‍वास संपादन केला आहे. ३३,००० चौरस फुटात वसवलेल्या या मॉलमध्ये फर्निचरशिवाय इतर अनेक गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. ४ मार्चपासून होणाऱ्या या गुढीपाडवा विशेष सेलचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सीएमएम अरेना व्यवस्थापनाने केला आहे.

संबंधित बातम्या