कचरा टाकताना सापडल्‍यास २५ हजारांचा दंड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

हरमल:हरमल कचरा समिती बैठकीत निर्णय
येथील कचरा व्यवस्थापन समितीच्या नियमांचे पालन न करता, रेस्टॉरंटचा कचरा उघड्यावर टाकताना सापडल्यास परिसर साफ करणे व २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई करणार असल्याचे कचरा समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. हरमल गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची मानसिकता ग्रामवासीयांनी अंगी बाळगावी, अशी मागणी सदस्यांनी एकमताने केली.

हरमल कचरा समितीची बैठक नुकतीच झाली.ज्याठिकाणी गाडी पकडली जाईल त्या परिसरातील सर्व कचरा साफ करून घेण्याची तरतूद केल्याची माहिती समितीचे सचिव बॉस्को फेर्नांडिस यांनी सांगितले.तसेच दंड म्हणून २५ हजार रुपये व रेस्टॉरंटचे कचरा शुल्क पाच हजार रुपये घेऊन त्यास कारवाईचा बडगा दाखविण्याचे ठरले.व्यावसायिकांनी कचरा इतरत्र न टाकता कचऱ्याची गाडी आल्यानंतर ओला व सुका कचरा, वेगवेगळ्या पिशवीतून कचरा गाडीत देण्यास सांगितले.
यंदाच्या मोसमात चार विविध घटना घडल्या असून गावाच्या स्वच्छतेसाठी कचरा समितीचे सदस्य वावरत आहे. त्याबद्दल गावातील नागरिक व व्यावसायिकांनी समितीस धन्यवाद दिले.
पर्यटनाच्या ठिकाणी ज्यांनी रेस्टॉरंट भाड्याने चालविण्यास दिली आहेत, त्यांनी कचऱ्याबाबत शुल्क भरावे व कचरा दररोज सकाळी येणाऱ्या गाडीत देण्याचे सक्ती करावी.अलीकडे आगारानजीकच्या रेस्टॉरंट ठिकाणी कचऱ्याच्या पिशव्या ठेवल्या जातात, त्याबाबत समितीच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतली.पंचायतीने परवाना शुल्क वसुली न केल्याने ही स्थिती होत असल्याचे सदस्य टोनी डिमेलो यांनी सांगितले.
पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बर्डे व सचिव बॉस्को फेर्नांडिस यांनी केले आहे.

मुरगाव मतदारसंघातील ९०० नावे वगळली

संबंधित बातम्या