रेती काढणाऱ्यांविरुद्धची कारवाई सुरू ठेवा -खंडपीठ   

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी: रेती काढणाऱ्यांविरुद्धची कारवाई सुरूच ठेवा
खंडपीठाचे सरकारला निर्देश : सुनावणी २३ जानेवारीपर्यंत तहकूब

पणजी: रेती काढणाऱ्यांविरुद्धची कारवाई सुरूच ठेवा
खंडपीठाचे सरकारला निर्देश : सुनावणी २३ जानेवारीपर्यंत तहकूब
राज्यातील नद्यांमधून बेकायदा रेती काढणाऱ्यांविरुद्ध सरकारी यंत्रणेने ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, ती गती कायम ठेवा. कायदेशीर रेती उत्खनन सुरू होण्यासाठी सरकारनेही पावले उचलण्याची गरज आहे, असे तोंडी निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अवमान याचिकेवर करून त्यावरील सुनावणी २३ जानेवारीपर्यंत तहकूब केली. गेल्या पंधरवड्यात सरकारी यंत्रणेने ३० छापे टाकून ९७८ घनमीटर रेती जप्त केली व नद्यांमध्ये असलेल्या १५ होड्या किनारी ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली.
सरकारतर्फे खाण खाते, पोलिस व बंदर कप्तानतर्फे गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करताना कारवाईचा अहवाल सादर केला. खाण खात्याने कोरगाव, कोलवाळ, वळवई, सुर्ला, विशमभर्डी, पोरस्कडे व मायणा फेरी, नावेली येथे ३० ठिकाणी साठा करून ठेवण्यात आलेली रेती जप्त करण्यात आली व ही रेती पुन्हा नद्यांमध्ये टाकण्यात आली. रेतीची बेकायदा वाहतूक करणारे ६७ ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. या कारवाईसाठी खाण खात्यातर्फे गोव्यातील विविध भागात ५ भरारी पथके तैनात करण्यात आली होती. यासंदर्भातची कारवाई यापुढे तशीच कायम राहणार असल्याचे खात्याने खंडपीठाला माहिती दिली आहे.

कारवाईसाठी २४ तास गस्‍त
मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठासमोर सरकारने बाजू मांडताना सांगितले की, बेकायदा रेती काढणाऱ्या होडी व बोटींविरुद्ध कारवाई करण्यासाठी बंदर कप्तानतर्फे दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली.या काळात वळवई वगळता इतर ठिकाणी नद्यांच्या किनारी होड्या उभ्या करून ठेवलेल्या आढळून आल्या.
खात्याच्या एम. व्ही. श्रवणी या गस्‍तिनौकेने जुने गोवे, आखाडा, पिळगाव व आमोणा येथे गस्त घालण्यात आली.मात्र रेती काढणे प्रकार आढळून आला नाही. जुने गोवे येथे ही गस्‍तिनौका उभी करून ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त कोठंबी येथे बेकायदा रेती काढणे दिसून आले नाही. वळवई येथे नदीमध्ये सुमारे १५ होड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या नदीच्या किनारी आणण्यास संबंधित मालकांना भाग पाडण्यात आले. मायणा येथे तीन होड्या नद्यांमधून किनारी जमिनीवर उभ्या करण्यात आल्या होत्या.आमोणा येथे पाच होड्या नदीच्या किनारी उभ्या होत्या. खांडोळा येथे २ होड्या किनारी जमिनीवर उभ्या केल्या होत्या व रेतीचा साठा आढळून आला, अशी माहिती बंदर कप्तानने माहिती दिली आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात बेकायदा रेती काढणाऱ्यांची तक्रार देण्यासाठी वेगळे फोन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अवमान याचिकादाराने दिलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित ट्रकांविरुद्ध त्या त्या परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.रेतीवाहू ट्रकांचीही तपासणी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. सर्व सरकारी यंत्रणाकडून बेकायदा रेती काढणाऱ्यांविरुद्ध व त्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांविरुद्ध कारवाई सुरू केल्याने बऱ्याच प्रमाणात यावर नियंत्रण आले आहे. तेरेखोल, शापोरा, मांडवी, झुआरी या नद्यांच्या काठावर साठा करून ठेवण्यात आलेली सुमारे ९७८ घनमीटर (सुमारे १५० ट्रक) रेती पुन्हा नदीमध्ये टाकण्यात आली आहे. साठा केलेले रेती जप्त करून ती सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यास काही स्थानिकांनी त्याला विरोध करत आहेत अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

पोलिसांची स्कूटर चोरणारा गजाआड

माहितीसाठी स्वयंसेवकांची मदत घ्या
बेकायदा रेती काढणाऱ्यांविरुद्ध कारवाईमध्ये सरकारने काही बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना स्वयंसेवकही सामावून घेतले जावे. माहिती देण्यास तसेच कारवाई करण्यास त्यांची मदत सरकारला होऊ शकते. खात्यातील काही कर्मचारी सुस्त असल्याने मदत करण्यास हे स्वयंसेवक पुढे येऊ शकतात. सरकारने यासंदर्भातही विचार करावा, असे तोंडी निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

 

संबंधित बातम्या