आमदारांवरील अपात्रता याचिकेवर १३, १४ फेब्रुवारीला सुनावणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजी: विधानसभेच्या. बारा आमदारांवर असलेल्यार अपात्रता याचिकेवर फेब्रुवारी महिन्यारत गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सुनावणी घेणार आहेत. या आमदारांचे संबंधित अपात्रता याचिकेसंदर्भातील म्हणणे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी ऐकून घेतले जाणार असल्यातचे सभापतींनी नोटिशीत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कालबद्ध पद्धतीने अपात्रता याचिकेसंदर्भात निर्णय घ्यावेत असा निर्देश दिल्यानंतर आठवडाभरात आज या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

मगोचे विधीमंडळ गट नेते या नात्याने आमदार सुदिन ढवळीकर यांनी या अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. मगोत फूट पडली नसून दोन तृतियांश मगो पक्ष भाजपमध्ये विलीन झालेला नाही‌. यामुळे आजगावकर आणि पाऊसकर यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार अपात्र ठरवावे अशी मागणी या याचिकांत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या याचिका त्यांनी सादर केल्या होत्या. आजगावकर आणि पाऊसकर यांनी मध्यरात्री आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना नंतर अनुक्रमे उपमुख्यमंत्रिपद व सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद देण्यात आले. त्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते.

मणिपूर येथील एका याचिकेवर निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेसंदर्भात निर्णयासाठी स्वायत्त व स्वतंत्र यंत्रणा असावी आणि त्यावर कालबद्ध पद्धतीने निर्णय द्यावा असे निर्देश दिले होते. त्याचे स्वागत करताना सभापती पाटणेकर यांनी संसदेने तसा पायंडा पाडल्यास उत्तम असे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी १० आमदारांआड सादर केलेली अपात्रता याचिका सभापतींसमोर प्रलंबित आहे. नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, आंतोनिओ फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, चंद्रकांत कवळेकर या दहा आमदारांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर चोडणकर यांनी ही याचिका सादर केली आहे. त्यांनीही पक्षात दोन तृतियांश फूट पडली नसल्याचा मुद्दा मांडला आहे.

संबंधित बातम्या