तेजपालविरुद्धची उच्च न्यायालयातील सुनावणी 16 जानेवारीपर्यंत तहकूब

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

पणजी (गोवा) ः सात वर्षापूर्वी एका महोत्सवावेळी हॉटेलातील कथित बलात्कारप्रकरणातील संशयित तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या खटल्यातील उलटतपासणीवेळी अनावश्यक प्रश्न त्याच्या वकिलांकडून विचारण्यास बंदी घालण्याचा अर्ज पीडित तरुणीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात केला होता. ही सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती आज संशयिताने केल्याने ती आता 16 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावरील सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या

आठवड्यापर्यंत तहकूब करण्याची विनंती पीडित तरुणीने केली होती ती गोवा खंडपीठाने मान्य केली. जानेवारी महिन्यात कामानिमित्त देशाबाहेर असल्याने खटल्यावरील सुनावणीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कारण पीडित तरुणीने दिले आहे. 

संबंधित बातम्या