रविवारी पावसाची शक्‍यता

Dainik Gomantak
शनिवार, 11 एप्रिल 2020

शुक्रवारी राज्‍यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. आता रविवारी म्‍हणजेच १२ मार्च रोजी राज्‍यात राज्यात ढगांच्या गडगडाटासह वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

पणजी,
शुक्रवारी राज्‍यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. आता रविवारी म्‍हणजेच १२ मार्च रोजी राज्‍यात राज्यात ढगांच्या गडगडाटासह वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार त्‍यानंतर मात्र १३ ते १५ मार्चंपर्यंत राज्‍यातलि वातावरण कोरड्या स्‍वरूपाचे असणार आहे. 
शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला वेधशाळेच्या निदर्शनानुसार तापमानात फारसा फरक पडलेला नाही. शनिवारीही दिवसभर राज्यात तप्त उन्ह आणि उकाडा होता मात्र दिवसभर सोसाट्याचा वाराही सूटला होता. आज कमाल तापमान 34 अंश सेल्सियस तर किमान तापमान 2५ अंश सेल्सियस इतके नोंद झाले. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात तापमान अधिक होते. रविवारी राज्‍यात सुमारे ४५ ते ५० किमी प्रतितास वेगात वारे वाहण्‍याची शक्‍यता वेधशाळेने व्‍यक्‍त केलेली असून लोकांनी काळजी घेण्‍यासाठीचे आवाहनही करण्‍यात आले आहे. 
 

संबंधित बातम्या