चौपदरी महामार्गाविषयी समस्‍या सोडविणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पेडणे:उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्‍या नागरिकांच्‍या समस्या

पेडणे:उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाणून घेतल्‍या नागरिकांच्‍या समस्या

पत्रादेवी ते विर्नोडापर्यंत चौपदरी मार्गासंबंधी लोकांच्या वाढत्या तक्रारींची दाखल घेऊन शनिवारी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावसकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.यावेळी मंत्र्यांसोबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर, कार्यकारी अभियंते नारायण मयेकर, फिलिप ग्रांव व अन्य अधिकारी उपस्थित होते.पत्रादेवी येथील रस्त्याची प्रथम त्‍यांनी पहाणी केली.सरपंच अशोक सावळ, पंच बबन डिसोजा यांनी येथील रस्त्याबाबत सूचना मांडल्या.त्यानंतर त्यांनी सक्राळ येथील रस्त्याची पहाणी केली.सक्राळ गावात जाण्यासाठी जोड रस्त्याव्यतिरिक्त रस्ता क्रॉसिंग ठेवण्याची मागणी नंदकुमार मोटे व कमलेश मोटे यांनी केली तर माजी उपसरपंच प्रभाकर मोटे यांनी या ठिकाणी मोठे सर्कल ठेवून वेग नियंत्रक बसवण्याची मागणी केली.राजवेलवाडा येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरसकर, माजी सरपंच मनोहर नाईक, पंचायत सदस्य तुळशीदास नाईक, ॲड. व्यंकटेश नायक यांनी मार्गाच्या वाढलेल्या उंचीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती दिली.या ठिकाणी गावाला जोडणाऱ्या रस्त्याला महामार्ग जोडला जाईल व इतर ज्या समस्या आहेत त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या ठिकाणी असलेला साकव एकदम छोटा असल्याने डोंगरावरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे सद्यस्‍थितीतच तलाव निर्माण होतो तर रस्त्याची उंची वाढल्यावर लोकांच्या घरात पाणी जाईल, याची कल्पना पत्रकारांनी बांधकाम मंत्र्यांसमोर मांडली असता मंत्र्यांनी अभियंत्यांना आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली.

रवळनाथ मंदिराकडील काम बंद ठेवा
तोरसे गावातील रवळनाथ मंदिराचे काम तात्पुरते बंद ठेवावे. या मंदिराचा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन शक्य होत असेल तर वगळण्यात यावे, अशी सूचना मंत्री बाबू आजगावकर यांनी केली. दुसऱ्या बाजूने जी जमीन आहे ती कायदेशीर सरकारच्या ताब्यात नाही, असे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगताच देवस्थानचे सचिव, माजी पंच प्रकाश शेटये यांनी त्यास आक्षेप घेतला. तोरसे गावातील कुठलीच जमीन सरकारने ताब्यात न घेताच सर्व काम केले आहे.प्रत्यक्ष देवस्थान समितीचीही जमीन कुठल्याच सोपस्काराविना घेऊन काम पूर्ण केले, असा प्रश्‍‍न त्यांनी केला.देवस्थानचे अध्यक्ष उपेंद्र परब, सूर्यकांत तोरस्कर, मनोहर नाईक, व्यंकटेश नाईक, समीर नाईक, महादेव शेटये, देवबा शेटये, पंचायत सदस्य उत्तम वीर, प्रभाकर मोटे, सुदन शेटये यांनी प्रश्‍‍न उपस्‍थित केले.व्यंकटेश नाईक यांच्यामार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी करुन उपाय काढण्याची सूचना मंत्री आजगावकर यांनी केली.त्यानंतर विर्नोडा नाक्यावर चौपदरी मार्गामुळे होणारी समस्या समजून घेतली.यावेळी सरपंच, पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर विर्नोडा नाक्यावर चौपदरी मार्गामुळे होणारी समस्या समजून घेतली. यावेळी सरपंच, पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या ठिकाणी भुयारी मार्ग न ठेवल्यास विर्नोडा व जवळच्या गावातील लोकांना चार किलोमीटर अंतर पार करुन गावात यावे लागेल याची माहिती दिली. यासंबंधी लक्ष देण्‍याचे आश्वासन मंत्री पावसकर यांनी दिले.
    हे वाचा हरमल किनाऱ्यावर लमाणी लोकांचा वाढता वावर
कडशी येथे उंच पूल बांधण्‍याची मागणी
कडशी मोप येथे जाण्यासाठी सद्यस्‍थितीत कोणतेच नियोजन नसल्याचे मोप माजी पंच उमेश गाड यांनी मंत्र्यांना दाखवून दिले. सध्‍याचा रस्ता खोलगट आहे, त्याला उंची देऊन नव्याने उंच पूल बांधावा, अशी मागणी केली.सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी या ठिकाणी सर्कल बांधणे अशक्य असून रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील व वेग नियंत्रणासाठी सिग्नलची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. त्यांची मागणी रास्त असल्याचे बांधकाम मंत्र्यांनी सांगितले.जमीनदार जमीन देत नसतील तर आहे त्या स्‍थितीतील रस्त्याची उंची वाढवून व नवीन पूल बांधून देण्याचे आदेश बांधकाम मंत्री पावसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

पल्स पोलिओ लसीकरण प्रमाण ९७ टक्के

संबंधित बातम्या