जनमत कौल हे इतिहासातील सोनेरी पान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

तेरेखो:जनमत कौल ही गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.त्यामुळेच आज आम्ही स्वाभिमानी जीवन जगतो आहोत. त्यासाठी युवकांनी देश हित व राज्य हितासाठी संघटित राहून आपले हक्क शाबूत राखण्यासाठी व उज्‍ज्वल भवितव्य घडविण्यासाठी जागृत व्हा. अन्याय अत्याचार मोढीत काढा.लोकहितार्थ घेतलेल्या निर्णयाला समर्थन देताना शासनकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रतिकार करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी केले.मांद्रे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमात गुरुवार ता.

तेरेखो:जनमत कौल ही गोव्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.त्यामुळेच आज आम्ही स्वाभिमानी जीवन जगतो आहोत. त्यासाठी युवकांनी देश हित व राज्य हितासाठी संघटित राहून आपले हक्क शाबूत राखण्यासाठी व उज्‍ज्वल भवितव्य घडविण्यासाठी जागृत व्हा. अन्याय अत्याचार मोढीत काढा.लोकहितार्थ घेतलेल्या निर्णयाला समर्थन देताना शासनकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रतिकार करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी केले.मांद्रे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमात गुरुवार ता. १६ रोजी गोवा प्रदेश काँग्रेस समिती व मांद्रे काँग्रेसतर्फे पालये भोम येथील भूमिका विद्यालयांत आयोजित केलेल्या जनमत कौल दिनाच्या कार्यक्रमांत आमदार रवी नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.के.शेख, माजी मंत्री संगीता परब, उपाध्यक्ष बाबी बागकर, उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिसे, कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा सचिव सचिन परब, गुरुदास नाटेकर डिचोली गट अध्यक्ष घनश्याम राऊत, सुदिन नाईक, प्रदेश सचिव व मांद्रे मतदार संघाचे निमंत्रक नारायण रेडकर, मांद्रे काँग्रेस सरचिटणीस प्रदीप हरमलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री. नाईक म्हणाले, आज गोवा राज्यांत चुकीची धोरणे राबवली जात आहेत. गोमंतकाची बाजारपेठ आज परप्रांतीयांनी काबीज केली आहे.याला कारण आमची आळशी व सुशेगाद संस्कृती आहे. त्यासाठी आजच्या युवकांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे.पेडणे तालुक्यांत होऊ घातलेला मोपा विमानतळ प्रकल्पांत तसेच तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या अन्य प्रकल्पांत पेडणेवासीयांना नोकरीत सरकारने प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी रवी नाईक यांनी केली.यावेळी त्यांनी जनमत कौलाविषयी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, पुरुषोत्तम काकोडकर, जॅक सिक्वेरा अन्य काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.गिरीश चोडणकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने जनकल्याणासाठी कायद्यात बदल केला. मात्र, भाजपकडून स्वतःच्या स्वार्थसाठी जनतेला वेठीस धरून कायदे बदलले जात आहेत.जनमत कौलांदरम्यान भाजप सत्तेवर असते तर जनमत कौल गोमंतकियाच्या विरोधांत गेला असता. काँग्रेसने गोवा हे गोमंतकीयांचेच व्हावे, यासाठी जसे मतदान केले त्याच्या रोखाने आज उद्भवलेल्या या परिस्थिती विरोधांत मतदान करण्याची गरज असल्याचे चोडणकर म्हणाले.एम.के.शेख म्हणाले, जनमत कौल व काँग्रेस पक्ष यांचे घनिष्ट संबंध असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाने जनमत कौलासाठी केलेला त्याग व जनमत कौलाचे महत्त्व विशद केले. काँग्रेस पक्षच विचार जनतेपर्यंत पोचवून पुन्हा पक्ष मजबूत करण्याचा निर्णय आजच्या शुभ दिनी घेण्याचे आवाहन यावेळी श्री. शेख यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षांत आज पक्षनिष्ठा राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी बाबी बागकर, सुदिन नाईक,आदींनी विचार मांडले.यावेळी आमदार रवी नाईक यांनी आपल्या तरुणपणात जनमत कौलावेळी ज्येष्ठांसोबत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने मांद्रे काँग्रेसच्यावतीने संगीता परब त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सचिन परब यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक नारायण रेडकर यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन प्रदीप हरमलकर यांनी केले. आभार आनंद शिरगांवकर यांनी मानले.

गोवा स्वातंत्र्य झाल्यापासून पेडणे शहराचा आवश्‍यकतेनुसार विकास झालेला दिसत नाही

संबंधित बातम्या