मयेत ३५० लाभार्थ्यांना ‘गृहआधार’

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

गृहआधार योजना लाभार्थींसमवेत आमदार प्रवीण झांट्ये. बाजूला दया कारबोटकर व इतर मान्‍यवर.

आमदार प्रवीण झांट्ये यांच्‍या उपस्‍थितीत वितरण

 

मये : मये मतदारसंघातील प्रत्येक घर, प्रत्‍येक व्यक्तीला केंद्र व राज्य सरकारची प्रत्येक योजना आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावी, यासाठी आमचे प्रयत्‍न आहेत. प्रत्येक भाजप कार्यकर्ता व पंचायत सदस्यांनी त्‍यासाठी पाठपुरावा करावा. तसेच जे आजही वंचित आहेत, त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे आमदार प्रवीण झांट्ये यांनी सांगितले.

पिळगाव, मये यासह अन्‍य भागातील सुमारे साडेतीनशे महिलांना गृहआधार योजनेच्या मंजुरी पत्रांचे वितरण आमदार झाट्ये यांनी केले. यावेळी भाजप अध्यक्ष दया कारबोटकर, उर्वी मसुरकर, शंकर चोडणकर, रसूल मदार, नरेंद्र तारी, विश्वास चोडणकर व इतर मान्‍यवर उपस्थित होते.
दयानंद कारबोटकर यांनी भाजप सरकार अनेक कल्याणकारी योजना आणून प्रत्येक घटकाला दिलासा देण्याचे कार्य करीत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी शंकर चोडणकर यांनी आमदार प्रवीण झांट्ये हे पाठपुरावा करून योजना घरोघरी पोहोचवत असून त्याचा सर्वच घटकांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. विश्वास चोडणकर यांनी स्वागत, उर्वी मसूरकर यांनी आभार मानले.

 

कुंकळ्ळी बनतेय वैद्यकीय कचऱ्याचे डपिंग ग्रांउड

संबंधित बातम्या