ग्रामीण भागात मधाचा व्यवसाय तेजीत

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

कोनग्याच्या पोळ्यात एकावेळी पांच लिटरपेक्षा जास्त मध मिळत असते पांचशे रूपये प्रति लिटर या दराने या अस्सल मधाची विक्री होते.

काणकोण

सध्या ग्रामीण भागात मधाचा व्यवसाय तेजीत आहे. पाचशे रुपये लीटर दराने मध विकले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

मानव करोना महामारीमुळे टाळेबंदीत असतानाही या काळात मधमाशांनी तयार केलेले मध माणूस संकलीत करू लागला आहे. साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच मधमाशा मधाचा संचय पोळ्यात करत असतात.या काळात निसर्गात फुलाचा बहर होत असतो.त्यामुळे ज्या ठिकाणी फुले बहरतात त्याच भागात  एप्रिल महिन्यापर्यत ही पोळी मधाने भरून जातात.

मधमाशा पालन हा फायदेशीर व्यवसाय आहे.मात्र या व्यवसाया व्यतिरिक्त निसर्गामध्ये जंगलात वसाहतीच्या आसपास मधमाशा आपली पोळी निर्माण करतात. जंगलातून याच काळात वनवासी लोक जंगलातून झाडाना लोबकळणाऱ्या मधमाशा पोळ्यातून मध मिळवतात. साधारणपणे कोनग्याचे मधमाशा या आकाराने  गांंजील माशा पेक्षा लहान असतात. त्यापेक्षा बारीक मध माशा भिंंतीत किंवा झाडाच्या ढोलीत मध तयार करतात या ऋतूत वनवासी समाज हे मध एकत्र करतात. कोनग्याच्या पोळ्यात एकावेळी पांच लिटरपेक्षा जास्त मध मिळत असते पांचशे रूपये प्रति लिटर या दराने या अस्सल मधाची विक्री होते.बारीक मधमाश्यांचे मध दुर्मिळ त्याचप्रमाणे औषधी मानले जाते त्याला मागणीही जास्त आहे. खोतीगाव,गावडोंगरीच्या काही भागात या दिवसांत हे नैसर्गिक मध संकलित करण्याचाही व्यवसाय काही नागरीक करतात.

वनखात्याच्या वन विकास महामंडळातर्फे रबर प्लांटेशनमध्ये  मधमाश्या पालन करून मध संकलन करण्यात येते होते.

 

संबंधित बातम्या