मांगूरहिलमध्‍ये हॉटमिक्‍स डांबरीकरण कामास सुरवात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मांगूरहिल येथील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरवात करण्यात आली.सुमारे २६ लाख रुपयांच्या कामाला वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांच्याहस्ते सुरवात करण्यात आली.

दाबोळी: वास्को मतदारसंघात विकासकामांना चालना देण्यासाठी वास्कोचे आमदार कार्लूस आमदार प्रयत्नशील असून आजपर्यंत वास्कोत अनेक विकास कामे त्यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणजे वास्कोतील अंतर्गत भागातील रस्त्यांचे हॉटमिक्‍सींग चालू करण्यात आले आहे. दरम्यान आज मांगोरहिल येथील एरिस्टोक्रेट इमारतीकडे अंतर्गत रस्त्याच्या हॉटमिक्‍सींग कामाला सुरवात करण्यात आली.यावेळी वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, स्थानिक नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्‍स, रवींद्र भवनच्या कार्यकारी सदस्य नोएला रॉड्रिग्ज, राया नाईक, अशोक मांद्रेकर, नगरसेवक यतीन कामूलेकर, शैलेश गोवेकर व इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटमिक्‍सिंग कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिक शैलेंद्र गोवेकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. श्री. गोवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार आल्मेदा यांनी सर्वप्रथम मान दिला.तसेच त्याला पुष्पगुच्छ देऊन आमदार कार्लूस आल्मेदा यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री. आल्मेदा यांनी यावेळी बोलताना वास्कोच्या विकासासाठी आपण झटत असून मांगूरहिल येथे अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्सिंग झाल्यानंतर बायणा येथील रस्त्यांच्‍या कामासाठी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार. तसेच वास्कोतील एफएल गोम्स मार्गाचे हॉटमिक्‍सिंगचे काम हातात घेतले जाईल यासाठी २ कोटी रुपये खर्च केला जाईल.अशा तऱ्हेने सात ठिकाणी हॉटमिक्‍सिंगचे काम केले जाईल यासाठी ७ कोटी रुपये खर्च केले जातील, असे ते म्हणाले. तसेच जो कोणी आपला प्रभाग स्वच्छ ठेवील त्याच्या प्रभागाला विशेष बक्षीस प्रदान केले जाईल, असे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी यावेळी जाहीर केले.

 

 

 

वेर्णा येथे कलिंगडाच्या पीकाचे नुकसान

संबंधित बातम्या