कैसा महिना गुजारा हम को ही पता!

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

आसामच्या कर्मचाऱ्यांचे अंतर्मन ः अर्ज भरण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव

विलास ओहाळ

पणजी, 

भैय्या, कैसा महिना गुजारा हम को ही पता है... जितना पैसा मिला उतनेसे कोई बचाकर रखा है... गावमे घरके सब लोग राह देख रहे है, सरकारने देरसेही सही लेकीन गाव जानेके लिए रस्ता तो खुला किया, ये हमारे लिए बढी बात है. पता नही वापस गोवा मे आयेंगे या नही... असे सांगत आसामहून अर्ज भरण्यासाठी आलेले कर्मचाऱ्यांरी ‘गोमन्तक'ला सांगत होते. अर्ज भरताना महिन्याभराचा निराशेचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावरून हटलेला दिसत होता.
केंद्र सरकारने ज्या राज्यात परराज्यातून कामासाठी आलेल्या कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी, असे आदेश दिल्यामुळे गोव्यातीलही पराराज्यांतून आलेले कर्मचारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आपली माहिती सादर करण्यासाठी आज धावले. कामगार दिनाची सुटी असली तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज यासाठी खुले ठेवण्यात आले होते. सकाळपासून काही कंत्राटदार आणि काही कामगारांचे समूह अर्ज सादर करण्यासाठी आले होते. सायंकाळपर्यंत हे कामकाज सुरू होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
गावाकडे जाण्याची संधी मिळत असल्याने आपली माहिती सादरीकरणासाठी आले होते. माहिती सादर करताना अनेकांना सुटीच्या दिवशी झेरॉक्स काढण्यासाठी पळापळ करावी लागली. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र असेल तर त्याच्या छायांकित प्रती काढून माहिती सादरीकरणाच्या रकान्यात नाव राहत असलेला पूर्ण पत्ता, ज्या राज्यात जाणार आहेत त्या राज्याचे नाव, जवळचे शहर, गाव आणि जिल्हा अशी माहिती सादर करावयाची आहे.
------
शिक्षणाच्या अभावामुळे मजुरी!
बांधकामावर मजुरीसाठी गोव्यात आलेले सातजण एकमेकांना विचारून आपली माहिती अर्जावर लिहीत होते, त्यांच्याशी विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, भैय्या, कैसा महिना गुजारा हम को ही पता है... जितना पैसा मिला उतनेसे कोई बचाकर रखा है... गावमे घरके सब लोग राह देख रहे है, सरकारने देरसेही सही लेकीन गाव जानेके लिए रस्ता तो खुला किया, ये हमारे लिए बढी बात है. पता नही वापस गोवा मे आयेंगे या नही... असे सांगत त्यांनी सध्यातरी गोव्यात न परतण्याचीच भाषा बोलून दाखविली. काहीजण आपली माहिती लिहण्यात गुंतले होते, तर काहीजण विचारपूस करीत होते. जो कागद माहिती भरण्यासाठी दिला होता, त्यातील रकान्यात स्वतःची माहिती लिहियाची होती, पण ज्याअर्थी ते इतरांना विचारून लिहीत होते, त्यावरून त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव दिसून येत होता.

संबंधित बातम्या