बूमूसने मानले चाहत्यांचे आभार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत अव्वल ठरत लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या एफसी गोवा संघाचा हुकमी मध्यरक्षक ह्यूगो बूमूस याने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहे.

``मी साऱ्या चाहत्यांचे आणि क्लबमधील प्रत्येकाचे यंदाच्या मोसमात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. सर्वांना मी सांगू इच्छितो, की पुढील मोसमात आम्ही आणखीनच ताकदवान बनून येऊ,`` असे फ्रान्समध्ये जन्मलेल्या बूमूसने नमूद केले. यंदाच्या आयएसएल स्पर्धेत या २४ वर्षी खेळाडूने ११ गोल केले, तर १० असिस्टचीही नोंद केली.

एफसी गोवाने यंदा लीग विनर्स शिल्ड जिंकून एएफसी चँपियन्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फुटबॉल क्लब हा मान एफसी गोवास मिळाला आहे. मात्र आयएसएल स्पर्धेत गतउपविजेत्यांचे आव्हान यंदा उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. चेन्नईत प्ले-ऑफच्या पहिल्या टप्प्यात एफसी गोवावर चेन्नईयीन एफसीने ४-१ असा विजय मिळविला. त्यानंतर गेल्या शनिवारी फातोर्डा येथे एफसी गोवाने दुसऱ्या टप्प्यात झुंजार खेळ करत ४-२ फरकाने सामना जिंकला. मात्र दोन सामन्यांतील गोलसरासरीत ६-५ असे निसटते वर्चस्व राखत चेन्नईयीन एफसीने अंतिम फेरीत प्रवेश केला.

प्ले-ऑफच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्याविषयी बूमूसने सांगितले, की ``आम्ही त्या लढतीत सर्वस्व ओतून खेळ केला आणि आमच्याकडून तेवढेच शक्य होते. आम्ही जवळपास लक्ष्य साध्य केले होते. सामन्यासाठी आलेले पाठिराखे अविस्मरणीय होते, पण दुर्दैवाने माझ्यासह संघ आणि गोव्याची मोहीम अकाली संपली.`` गेल्या शनिवारी चेन्नईयीन एफसीला नमवून एफसी गोवाने घरच्या मैदानावर सलग ७ आयएसएल सामने जिंकणारा पहिला आणि एकमेव संघ हा पराक्रम साधला. यंदाच्या मोसमात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा एकूण १० सामने खेळला, त्यापैकी ८ लढतीत विजय नोंदविले, त्यापैकी ७ सामने सलगपणे जिंकले.

एफसी गोवाची आयएसएल मोसमातील कामगिरी
- एकूण सामने : २०
- विजय : १३, बरोबरी : ३, पराभव : ४
- गोल नोंदविले : ५१, गोल स्वीकारले : २९
 
संबंधित बातम्या