शिकारीच झाला शिकाऱ्याचा बळी, व्हावटी-सर्वण जंगलात घडली घटना

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

डिचोली : ‘साळुंदर’ या रानटी प्राण्याच्या शिकारीवेळी झाडलेली बंदुकीची गोळी शरीरात घुसल्याने एका शिकाऱ्याचा बळी जाण्याची घटना घडली. ही घटना काल (मंगळवारी) रात्री व्हावटी-सर्वण परिसरातील जंगलात घडली.

या घटनेत व्हावटी येथील संतोष यशवंत गोवेकर (वय-५५) या शिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बंदुकीतून गोळी झाडणारा व्हावटी येथील आनंद यशवंत गावडे (वय-३९) हा संशयित युवक रात्री उशिरा पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांनी संशयिताला रितसर अटक केली.

ऐन शिमगोत्सवाच्या धामधुमीत ही दु:खद घटना घडल्याने व्हावटी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, कालच्या घटनेप्रमाणेच पंधरा वर्षापुर्वी कुळण-सर्वण येथे बंदुकीची गोळी लागून कारापूर येथील एका व्यक्‍ती मृत्यूमुखी पडला होता.

यासंबंधी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हावटी-सर्वण येथील रहिवासी मयत संतोष गोवेकर हा काजू बागायतीतून आणि संशयित आनंद यशवंत गावडे हा दारुभट्टीवरून घरी आल्यानंतर दोघेही काल (मंगळवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकमेकांना भेटले. दोघांनीही शिकारीसाठी जाण्याचा बेत आखून दोघेही व्हावटीच्या मागील ‘शेवरो’ परिसरातील जंगलात गेले. ‘साळुंदर’ या रानटी प्राण्याचे वास्तव्य असणाऱ्या बिळापाशी दोघांनीही पाळत ठेवली.

...आणि विपरित घडले! 

पाळत ठेवलेले ‘साळुंदर’ बिळातून बाहेर येताच, मयत संतोष हे साळुंदरला अडवून ठेवण्याच्या प्रयत्नात असताना आनंद गावडे यांनी साळुंदरावर झाडलेल्या बंदुकीतील काडतुसीचे ‘मुलशांव’ संतोष याच्या शरीरात घुसले. त्याबरोबर संतोष जमिनीवर कोसळला. लागलीच आनंद याने मोबाईलवरुन संतोष याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्याबरोबर संतोष याचा पुतण्या सुशांत रामा गोवेकर आणि अन्य काहीजणांनी जंगलात धाव घेतली. घायाळ अवस्थेत पडलेल्या संतोष गोवेकर याला उचलून उपचारासाठी डिचोली आरोग्य केंद्रात आणले असता, केंद्रातील डॉक्‍टरनी संतोष याला मृत घोषित केले.

संबंधित बातम्या