'मास्क' वापरत नसाल, तर सावधान!

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

डिचोलीत परिसरात दंडात्मक कारवाई सुरु, मास्कचेही वाटप

डिचोली 

'मास्क' न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरत असाल, तर सावधान..! मास्न न वापरण्याचा निष्काळजीपणा करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. 'कोरोना' (कोविड-१९) महामारीपासून बचाव व्हावा. यासाठी प्रत्येकाने खास करुन सार्वजनिक ठिकाणी वावरताना 'मास्क' वापरणे अनिवार्ह बनले आहे. तसा आदेशही राज्य सरकारने जारी केला असून, त्याची कार्यवाही डिचोलीत सुरु झाली आहे. 'मास्क' वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकाविरोधात डिचोलीत दंडात्मक कारवाई सुरु झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी तलाठ्यांना तसे निर्देश दिले आहेत. आजपासून (शुक्रवारी) डिचोली शहरात या कारवाईला प्रारंभ झाला. पोलिस आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिचोली मामलेदार कार्यालयातील तलाठ्यांनी आज कारवाई करताना अनेकजणांना दंड ठोठावला. मास्क न वापरणाऱ्यांना दंड देतानाच त्यांना 'मास्क' ही देण्यात आले.

संबंधित बातम्या