आयआयटी कर्मचाऱ्यांना बोलण्यास मज्जाव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

मुंबई:आयआयटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून माध्यमबंदी
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध देशातील विविध संस्थांमध्ये करण्यात येत आहे. या निदर्शनांमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले असून, मुंबई आयआयटीमध्येही आंदोलन सुरू आहे.त्यामुळे आयआयटी प्रशासनाने परिपत्रक काढून आंदोलकांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास अथवा कोणतेही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. केंद्रीय विद्यापीठांमधील विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी होत आहेत. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच सर्व संस्थांच्या संचालकांना पत्र पाठवून आंदोलनात सहभागी होणारे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना रोखण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता आयआयटी मुंबईने परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी स्वत:च्या नावाने अथवा नाव न सांगण्याच्या अटीवर अथवा इतर पर्यायी नावाने संवाद साधू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेची ध्येयधोरणे व सरकारी धोरणांना बाधा येईल अशी कोणतीही टीका करू नये, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सर्व कर्मचाऱ्यांनी याबाबत खबरदारी घ्यावी; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयआयटी प्रशासनाने दिला आहे. सेवा नियमांच्या अधीन राहूनच हे परिपत्रक काढल्याचा दावाही करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या