चौगुले खाणीवर बेकायदा उत्खनन - शिरगावच्या नागरिकांचा आरोप:आज मामलेदारांकडून पाहणी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

डिचोली: शिरगावमधील पाण्याच्या बिलांचा प्रश्‍न तापला असतानाच, पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन चालू असल्याची माहिती समोर आली आहे.पाणी बिलांच्या थकबाकीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीच्या नावाखाली चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन चालू आहे, असा खळबळजनक आरोप शिरगाववासियांनी केला.तसेच खनिज उत्खननासाठी झाडांची कत्तलही करण्यात आल्याचा दावाही शिरगावचे सरपंच सदानंद गावकर आणि अन्य नागरिकांनी केला आहे.

डिचोली: शिरगावमधील पाण्याच्या बिलांचा प्रश्‍न तापला असतानाच, पैरा-शिरगाव येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन चालू असल्याची माहिती समोर आली आहे.पाणी बिलांच्या थकबाकीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीच्या नावाखाली चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन चालू आहे, असा खळबळजनक आरोप शिरगाववासियांनी केला.तसेच खनिज उत्खननासाठी झाडांची कत्तलही करण्यात आल्याचा दावाही शिरगावचे सरपंच सदानंद गावकर आणि अन्य नागरिकांनी केला आहे.
शिरगावच्या नागरिकांनी खनिज उत्खननाबाबतीत केलेल्या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली असून, या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर (मंगळवारी) सायंकाळी ४ वा. डिचोलीच्या मामलेदारांकडून चौगुले खाणीची पाहणी करण्यात येणार आहे.तसे निर्देशही उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी मामलेदार प्रवीणजय पंडित यांना दिले आहेत.दरम्यान, पाणी बिलांच्या प्रश्‍नी निर्माण झालेल्या वादावर आजच्या बैठकीत तोडगा निघाला नसला, तरी संबंधित खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली आहे.या विषयावर आता गुरुवारी (ता.३०) सकाळी १० वा. पुन्हा बैठक होणार असून त्या बैठकीत निर्णायक तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.गेल्या शनिवारपासून बंद असलेल्या खनिज वाहतुकीचे भवितव्यही त्याचदिवशी स्पष्ट होणार आहे.पाणी बिलांच्या वादावर गेल्या आठ दिवसात आत्तापर्यंत तिनवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत.
खाण बंदीपासून जवळपास दोन वर्षे होत आली.संबंधित खाण कंपन्यांनी शिरगावातील ३७१ घरगुती नळांची पाण्याची बिले भरलेली नाहीत. बिलांच्या थकीत रकमेचा आकडा १९.७५ लाख असा आहे. बिलांची थकीत रक्‍कम भरणा करा अन्यथा नळजोडण्या तोडण्यात येतील अशा नोटीसा पाणीपुरवठा खात्याने नारिकांना दिल्या आहेत.या नोटीसीमुळे स्थानिक अस्वस्थ तेवढेच आक्रमक बनले आहेत.याच मुद्यावरुन गेल्या आठवड्यात सोमवारी आणि शनिवारी मिळून दोनवेळा शिरगाववासिय रस्त्यावर उतरले.या वादावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) सकाळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या चेम्बरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस शिरगावमधील नागरिक खास करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मामलेदार प्रवीणजय पंडित आणि संजय दळवी हेही बैठकीस उपस्थित होते.
संबंधित खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीस पाचारण करावे अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पुन्हा सायंकाळी बैठक बोलाविण्यात आली.या बैठकीस शिरगाव वासियांसमवेत संतोष मांद्रेकर (सेझा), श्री. पर्रीकर (बांदेकर) आणि श्री. साबळे (चौगुले) हे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत पाणी बिलांच्या थकबाकीचा विषय नागरिकांनी लावून धरला.त्यावेळी हा विषय वरिष्ठांच्या कानावर घालून गुरुवारपर्यंत निर्णय कळविण्यात येईल, असे खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.त्यामुळे पाणी बिलांच्या प्रश्‍नावर गुरुवारच्या बैठकीत निर्णय अपेक्षीत आहे.तोपर्यंत खनिज वाहतुकीही बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात पत्रके

गेल्या शनिवारी खनिज वाहतूक रोखून धरल्यानंतर खनिज भरणे बंद करा असे सांगण्यासाठी चौगुले खाणीवरील प्लांटवर गेले असता, त्याठिकाणी बेकायदेशीपणे खनिज उत्खनन चालू असल्याचे निदर्शनास आले. झाडांचीही कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले.जोपर्यंत पाणी बिलांच्या थकबाकीचा विषय सुटत नाही तोपर्यंत नागरिक मागे हटणार नाहीत.
- सदानंद गावकर, सरपंच, शिरगाव

संबंधित बातम्या