बेकायदा लाकूड वाहतूकप्रकरणी कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:बेकायदा लाकूड वाहतूकप्रकरणी म्हापसा येथे तिघांना अटक
दोडामार्ग (महाराष्ट्र) येथून जळाऊ बेकायदेशीर लाकूड घेऊन गोव्यात आलेला ट्रक म्हापसा येथे अडविण्यात आला. वन खात्याच्या पणजी विभागाने केलेल्या या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली तसेच जळाऊ लाकूडसह ट्रक जप्त करण्यात आला आहे.यामध्ये सुमारे ७.५ घनमीटर लाकूड होते, अशी माहिती या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या व्यक्तींची नावे सुरेश फाळे (इंदिरनगर - कोपार्डे), ट्रकचा चालक धाकू पाटील (खोलपेवाडी साळ - डिचोली) व एका मदतनीसाचा समावेश आहे.महाराष्ट्रातील सावंतवाडीचा काही भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने या भागात वृक्षतोडीला बंदी आहे.मात्र या भागातून बेकायदेशीर झाडे तोडून त्याची वाहतूक गोव्यात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.हे जळाऊ लाकूड बेकरी उद्योगासाठी विकले जाते.त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पाळत ठेवून ही कारवाई केली आहे. पणजीचे क्षेत्रीय वन अधिकारी नितीन कुंकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माराम देसाई, राजगुरू ताम्हणकर, संभा धुराट व कमलेश नाईक या पणजी वन विभागातील कर्मचाऱ्यांचा ही कारवाई केली.

अॅक्सिस म्युच्युअल फंडचा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड

संबंधित बातम्या