रेती पुन्हा नदीत फेकली जाते तेव्हा

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

तुकाराम सावंत

डिचोली

तुकाराम सावंत

डिचोली

डिचोली तालुक्यातील सुर्ल भागात आज (गुरुवारी) भरारी पथकाने धाड घालून बेकायदेशीरपणे मांडवी नदीकिनारी साठवून ठेवलेली रेती जेसीबी यंत्राच्या सहायाने पुन्हा नदीत टाकली. मुंबई उच्च न्यायालय, गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या नेतृवाखालील भरारी पथकाने रुमटावाडा-सुर्ल येथे ही कारवाई केली.
आजच्या या कारवाईमुळे न्यायालयाचे निर्देश धुडकावून तालुक्‍यात बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरुच असल्याच्या शक्‍यतेस पुष्टी मिळाली आहे. या कारवाईमुळे तालुक्‍यातील रेती माफियांचे आता धाबे दणाणले आहेत. सुर्ल भागात मांडवी नदीतून बेकायदेशीरपणे उत्खनन केलेली रेती नदीकिनारी साठवून ठेवल्याची माहिती मिळताच, मामलेदार श्री. पंडित यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने सुर्ल भागात धडक दिली. उत्खनन करुन नदीकिनारी साठवून ठेवलेली साधारण ९० क्युबिक मीटर रेती मांडवी नदीत टाकण्यात आल्याची माहिती मामलेदार पंडित यांच्याकडून मिळाली आहे. या कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आजच्या कारवाईवेळी या पथकात खाण खात्याचे भुगर्भतज्ञ महेश मयेकर, मामलेदार कार्यालयातील सर्कल इन्स्पेक्‍टर सहदेव मोटे आणि तलाठी आनंद नारुलकर यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या