ऑस्कर पाशेकोरुवात एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकिंग संबंधित चाललेल्या संभाषणातून झाली आणि दुसरा-तिसरा विचार न करता आठ वर्षीय ऑस्कर पाशेको, आपले वडील रायन यांच्याबरोबर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प च्या ट्रेकिंगला जायला तयार झाला.
गेल्या महिन्यात 4 एप्रिल 2022 रोजी त्याने आपली ही मोहीम पूर्ण देखील केली.
हे केवळ ट्रेक यापुरते मर्यादित नव्हते तर तो पिता-पुत्र यामधल्या घट्ट नातेसंबंधातला एक महत्त्वाचा टप्पाही होता.
अशाप्रकारच्या ट्रेकला जाण्यासाठी नवशिक्यांना कशाची आवश्यकता आहे यावर तीन महिने त्यांचे संशोधन चालू होते. ‘हिमालयन वंडरर्स’ या नेपाळ स्थित टूर कंपनीशी ते त्यासाठी संपर्क साधून होते.
दुबईत वास्तव्याला असल्यामुळे, संयुक्त अरब अमिरातीमधील शॉका पर्वतावर दर शनिवार आणि रविवार ते चढाई करत होते. त्यामुळे सहनशक्ती वाढण्यास मदत झालीच त्याचबरोबर हिमालयात उंचीवर विरळ होत जाणार्या ऑक्सिजन पातळीचा सामनाही त्यांना करता आला.
समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर उंचीवर ते पोचले, तेव्हा तिथले थंड हवामान आणि ऑक्सिजनची कमी पातळी यांनी त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली. शेवटचा टप्पा असणारा गोरक्षेप ते एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा शेवटचा दिवस सर्वात अधिक थकवणारा होता. केवळ ‘बेस कॅम्प एक तासाच्या अंतरावर आहे’ या एका माहितीमुळे पाय कसेबसे पुढे रेटले जात होते.
आणि नंतर ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प- 5364 मीटर’ हा बोर्ड दिसणे हा त्यांच्यासाठी साऱ्या थकव्यावरचा उतारा ठरला. लहानग्या ऑस्करसाठी तर तो क्षण, जन्मभर उराशी बाळगून ठेवण्यासारखा नक्कीच होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.