संचारबंदी असताना देखील पणजीमधील हिरा पेट्रोल पंप जवळ गाड्यांची तोबा गर्दी

संचारबंदी असताना देखील पणजीमधील हिरा पेट्रोल पंप जवळ गाड्यांची तोबा गर्दी. कोणीही राज्यसरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना दिसत नाहीये. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कडक संचारबंदी लागू केल्‍यानंतर आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांची  संख्या घटली नाहीच. उलट आज दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 50 जणांना बळी गेला. गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 561 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्‍या दहा दिवसांमध्ये 30 हजार 598 एवढे नवे कोरोनाबाधित  सापडले.  सरासरी 50 च्‍या संख्‍येने जाणाऱ्या बळींची संख्‍या रोखण्‍यासाठी सरकारकडूनही शर्थीचे प्रयत्‍न सुरू आहेत. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार राज्यात चोवीस तासांत 6,107 कोरोना संशयितांची तपासणी करण्‍यात आली. त्यामध्ये 2804 नवे कोरोनाबाधित सापडले. दिवसभरामध्ये 2367 जण कोरोनावर उपचार घेत होते, त्‍यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी गेले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com