
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मिजवान फॅशन शोमध्ये डिझायनर मनीष मल्होत्रासाठी वॉक करतांना दिसले.
दोघेही हातात हात घालून वॉक करत होते आणि त्यांनी कॅमेर्यासाठी पोझ दिल्याने ते खूपच सुंदर दिसत होते.
स्टार-स्टडेड फॅशन नाईटला अभिनेत्री शबाना आझमी यांनी होस्ट केले आहे. त्या साथीच्या आजारानंतर तब्बल तीन वर्षांनी शहरात परतल्या आहेत.
मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका दोघांनाही हटके पोज दिली.
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरही त्यांच्या रॅम्प वॉकचे फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच रणवीरने पेपर मॅगझिनसाठी नग्न पोज दिल्याने तो वादात सापडला होता.
या शूटमुळे अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता. आणि सर्वच क्षेत्रातून त्याच्यावर टिका होत होत्या.
सोमवारी मुंबईतील वकील आणि एका एनजीओने अभिनेत्याविरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी या अभिनेत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 आणि 509 तसेच आयटीच्या कलम 67 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.