Kolhapur Floods: कोल्हापूर पुन्हा महापुराच्या विळख्यात

पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट असतानाही आता पन्नास फुटाच्या वर पाणी पोहचले आहे.
Kolhapur Floods
Kolhapur FloodsDainik Gomantak

कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदीने (Panchaganga River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. आणि आंबा घाटात दरड कोसळली आहे. दरम्यान पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सकाळी 11 वाजता 50 फूट 10 इंच इतकी वाढल्यामुळे जिल्ह्यात महापूर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट असतानाही आता पन्नास फुटाच्या वर पाणी पोहचले आहे. जिल्ह्यातले एकूण 116 बंधारे पाण्याखाली गेले आहे, आता शहरातही पाणी शिरले आहे. सध्यपरिस्थितीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याचा विसर्ग 68 हजार 334 क्‍युसेक आहे.

Kolhapur Floods
Kolhapur FloodsDainik Gomantak

कोल्हापुरातील या रस्त्यांवरील वाहतूक बंद

पुणे- बेंगलोर NH-4 हायवलगत असणारा सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा सर्विस रोड आणि बेंगलोर पुणेकडून शिरोलीकडे जाणारा सर्विस रोड बंद करण्यात आला आहे, रोडवर 3-4 फूट पाणी आले आहे.

सांगली फाटा ते सांगलीकडे जाणारे शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बललाईन कडे जाणाऱ्या रोडवर पाणी साचल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे.

Kolhapur Floods
Kolhapur FloodsDainik Gomantak

हनुमान नगर शिये -कसबा बावड्याकडे जाणारा रस्ता शाहूपुरी पोलिस ठाणे हद्दीतील शिये नाका या ठिकाणी बंद करण्यात आला असून हनुमान नगर येथे बॅरीकेटिंग लावण्यात आले आहे. बावड्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

Kolhapur Floods
Kolhapur FloodsDainik Gomantak

आडवा ओढा येथे रोडवर तीन ते चार फूट पाणी साचल्याने शिये-भुये, निगवेकडे जाणारा मेन रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Kolhapur Floods
Kolhapur FloodsDainik Gomantak

महापूराची परिस्थिती बघता लोकांनी स्थलांतर करायला सुरवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com