Sachin Tendulkar 100th Century: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठमोठे विक्रम केले आहेत. त्याच्या नावावर असे काही विक्रम आहे, ज्यापर्यंत पोहचणे सध्या क्रिकेटपटूंसाठी मोठे कठीण काम आहे. असाच एक विश्वविक्रम म्हणजे 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा.
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतके करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.
सचिनने 100 वे शतक 16 मार्च 2012 रोजी म्हणजेच बरोबर 11 वर्षांपूर्वी पूर्ण केले होते. त्याने आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध खेळताना हे शतक ठोकले होते.
मिरपूरमधील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या आशिया चषकाच्या या सामन्यात सचिनने 147 चेंडूत 114 धावांची खेळी केली होती. हे त्याचे 100 वे शतक ठरले.
या सामन्यात सचिन व्यतिरिक्त भारताकडून विराट कोहलीने 66 धावांची आणि सुरेश रैनाने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताने 50 षटकात 5 बाद 289 धावा उभारल्या होत्या.
मात्र, बांगलादेशने 290 धावांचे आव्हान 49.2 षटकात 293 धावा करत पूर्ण केले होते. त्यामुळे या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचमुळे सचिनच्या 100 व्या शतकालाही पराभवाची किनार लाभली होती.
ही आशिया चषक स्पर्धा सचिनच्या कारकिर्दीतील अखेरची वनडे स्पर्धाही ठरली. त्याने या स्पर्धेनंतर 2012 मध्येच वनडेतून निवृत्तीची घोषणा केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.