कतरिना कैफ होणाऱ्या सासूसोबत लागली लग्नाच्या तयारीला!

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नाच्या बातमीवरती अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी दोघांच्या लग्नाबाबत रोज काही ना काही अपडेट येत आहेत.
कतरिना कैफ होणाऱ्या सासूसोबत लागली लग्नाच्या तयारीला!
katrina kaif and vicky kaushalDainik Gomantak

कतरिना कैफ आणि विकी कौशल (katrina kaif and vicky kaushal) यांच्या लग्नाच्या बातम्या (Wedding news) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दोघेही पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, विकी आणि कतरिना या दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. कतरिनाने तिच्या कामातून एक महिन्याचा ब्रेक घेतला आहे आणि ती आता तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.

katrina kaif and vicky kaushal
katrina kaif and vicky kaushalDainik Gomantak

आता विकी कामात व्यस्त असल्याने तो कतरिनासोबत लग्नाच्या तयारीसाठी येऊ शकत नाही. पण यादरम्यान कतरिना तिच्या सासू अर्थात विकी कौशलच्या आईसोबत लग्नाच्या तयारीत करत आहे. विकीचा भाऊ सनी कौशल आणि त्याची आई कतरिनासोबत लग्नाच्या तयारीत आहे.

katrina kaif and vicky kaushal
katrina kaif and vicky kaushalDainik Gomantak
Summary

कतरिनाने लोकप्रिय सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची मुखर्जीसोबत लग्नाचे 3 लुक फायनल केले आहेत. पण विकीचा लूक अजून बाकी आहे. विकीचा भाऊ आणि आई दोघेही कतरिनासोबत विकीचा लूक फायनल करत आहेत.

katrina kaif and vicky kaushal
katrina kaif and vicky kaushalDainik Gomantak
Summary

विकीच्या आईचे संपूर्ण लक्ष या दोघांच्या लग्नावर आहे आणि ती कतरिनाला तिच्या शॉपिंगमध्ये (Wedding shopping) मदत करत आहे. तर त्यानुसार कतरिनाही तिच्या भावी सासूसोबत भरपूर क्वालिटी टाइम घालवत आहे.

katrina kaif and vicky kaushal
katrina kaif and vicky kaushalDainik Gomantak
Summary

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. कतरिनाला राजस्थानची शाही संस्कृती आवडते, त्यामुळे ती विक्कीसोबत राजस्थान मध्ये शाही पद्धतीने लग्न करणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com