अफगाणिस्तानातील रेस्टॉरंटमध्ये पती-पत्नीला एकत्र बसता येणार नाही, तालिबानच नव फर्मान

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या दिवशी उद्यानांमध्ये जाऊ शकतात, असा आदेश दहशतवादी संघटनेने जारी केला आहे.
अफगाणिस्तानातील रेस्टॉरंटमध्ये पती-पत्नीला एकत्र बसता येणार नाही, तालिबानच नव फर्मान
Taliban Men and women Dainik Gomantak
Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

काबूल: तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानचे चित्र बदलले आहे. सर्व निर्बंधांचा सामना करणाऱ्या महिलांनाही आता रेस्टॉरंटमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने पती-पत्नीला रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसण्यास बंदी घातली आहे.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या दिवशी उद्यानांमध्ये जाऊ शकतात, असा आदेश दहशतवादी संघटनेने जारी केला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानातील तिसरे सर्वात मोठे शहर हेरातमध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यास बंदी घालण्यात आली होती आणि त्यांचे संपूर्ण शरीर झाकण्यास सांगितले होते.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

काबुल न्यूजनुसार, हेरातमध्ये एक तालिबान तुरुंग देखील आहे जिथे पुरुष साथीदारांशिवाय टॅक्सीमध्ये बसल्याबद्दल महिलांना कोणत्याही चौकशीशिवाय कैद केले गेले. शालेय विद्यार्थिनींना त्यांच्या पुरुष वर्गमित्रांसह फोटो काढण्यासाठी देखील शिक्षा दिली जाते. तालिबान महिलांच्या अशा कृत्यांना गुन्हा मानतात.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

अफगाणिस्तानात मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. तालिबान देखील त्यांच्या मागील कार्यकाळाच्या तुलनेत उदारमताने राज्य करण्याच्या आश्वासनावर मागे गेला आहे.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

हे नियम पती-पत्नीलाही लागू होतात,

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने नवीन आदेशाला पुष्टी दिली. ते म्हणाले महिला आणि पुरुषांना रेस्टॉरंटमध्ये स्वतंत्रपणे बसण्यास सांगण्यात आले आहे. रियाझुल्ला सीरत यांनी एएफपीला सांगितले की रेस्टॉरंट मालकांना तोंडी चेतावणी देण्यात आली आहे की "ते पती-पत्नी असले तरीही" नियम सर्वांना लागू होतात.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

एका अफगाण महिलेने सांगितले की, बुधवारी हेरात रेस्टॉरंटमधील व्यवस्थापकाने तिला आणि तिच्या पतीला वेगळे बसण्यास सांगितले. रेस्टॉरंट मालक तालिबानच्या या आदेशाकडे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान म्हणून पाहत आहेत.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

डोक्यापासून पायापर्यंत बुरखा, एकट्याने प्रवास करण्यावर बंदी, वाचन आणि गाण्यावर बंदी अशा कित्येक महिलांना तालीबानच्या या कठोर नियमांचा सामना करावा लागत आहे.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

जाणून घ्या तालिबानच्या राजवटीत महिलांवर काय निर्बंध आहेत?

महिला घरी व्यायाम करतील

तालिबानच्या अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार महिला आणि पुरुष वेगवेगळ्या दिवशी हेरातच्या उद्यानात जातील. महिलांना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी उद्यानात जाण्यास सांगण्यात आले आहे. इतर दिवशी पुरुष उद्यानात जाऊ शकतात.

Taliban Men and women
Taliban Men and women Dainik Gomantak

महिलांना या काळात व्यायाम करायचा असेल तर त्यांनी घरीच केलेला बरा. देशभरात महिलांना आधीच एकट्याने बाहेर जाण्यास मनाई आहे आणि आता हेरातमध्ये महिलांचे ड्रायव्हिंग लायसन्सही बंद झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.