गोवा वस्तुसंग्रहालयाला 34 वर्ष सेवा देणारे 'सदाशिव परब'

चित्रकला, शिल्पकला, सादरीकरण कला अशा कलांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सदाशिव परब यांनी औपचारिक शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध केले आहे.
गोवा वस्तुसंग्रहालयाला 34 वर्ष सेवा देणारे  'सदाशिव परब'

Sadashiv Parab' serving Goa Museum for 34 years

Dainik Gomantak 

सदाशिव परब हे मूळ मूर्तिकार घराण्यातले. गणपतीची माती हाताने मळता-मळता त्यांच्या तळहातांवरचे कलेचे वळण बोटांवर आले आणि मग त्यांनी कागदावरही त्याच तन्मयतेने चित्रकलेचे विश्व विस्तारले. आपल्या आयुष्याचे अर्धशतक ते या कलाक्षेत्रात आहेत. चित्रकला, शिल्पकला, सादरीकरण कला अशा कलांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी औपचारिक शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध केले आहे.

गणपतीची मूर्ती (Ganesh Idol) तयार करणारा हा पारंपरिक कलाकार समकालीन कलांकडे (Art) कसा वळला? या प्रश्नाचे उत्तर देताना सदाशिव परब सांगतात, ‘स्वतःला विकसित करणे हे सूत्र मी नेहमीच ध्यानात ठेवले होते .’ ‘गुरुशिवाय मार्ग नाही’ या उक्तीची प्रचिती त्यांना ते ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट’मध्ये शिकताना खऱ्या अर्थाने आली, जेव्हा ते सद्गुरु चेंदवणकर या चित्रकला शिक्षकांच्या संपर्कात आले. चेंदवणकर सरांकडून ते रंगलेपन (कलर रेंडरिंग) तर शिकलेच पण त्याशिवाय सरांकडून त्यांना चित्रकृतींमधून स्वतःचे विचार कसे मांडावे हे देखील शिकता आले. आपल्या चित्रांवर आपली छाप असायलाच हवी हे सरांनी त्यांना शिकवले. रंगरेषांमधून आपले म्हणणे चित्रांद्वारे मांडायला धारिष्ट्य लागते हे चेंदवणकर सरांकडून आपल्याला शिकायला मिळाले असे ते कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.

<div class="paragraphs"><p>Sadashiv Parab' serving Goa Museum for 34 years</p></div>
गोव्यातील मिलिंद म्हाडगुत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

सदाशिव परब यांनी फाईन आर्टमध्ये चित्रकलेच्या घेतलेल्या शिक्षणाबरोबरच कला अकादमीमधून नाट्यशास्त्राचेही शिक्षण घेतले आहे. त्याशिवाय म्युरल, शिल्प संवर्धन, धातु संवर्धन इत्यादी कलाविषयक क्षेत्रांचाही अभ्यास त्यानी केला आहे. त्यांच्या कलाकृतींसाठी त्यांना वेळोवेळी अनेक पुरस्कार लाभले आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक प्रदर्शनात त्यांनी आपल्या कलाकृती मांडलेल्या आहेत.

गोवा (Goa) राज्य वस्तुसंग्रहालयाला त्यांनी 34 वर्षे सेवा देऊन तिथल्या अनेक कलाकृतींचा पुनरुद्धार करण्यात आपला हातभार लावलेला आहे.सदाशिव परब यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीला प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. चित्र (Photo)आणि (म्युरल सदृश्य)शिल्प यांचा आकर्षक मेळ या कलाकृतीत सदाशिव परब यांनी घातला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com