'अब के साजन सावन में...', पावसाळी वातावरणात भूरळ घालणारी बॉलिवूड गाणी

बॉलिवूड चित्रपटांमध्येही श्रावणावर अनेक गाणी बनवली गेली आहेत, जी आजही सिनेरसिकांच्या ओठांवर आहे.
Sawan Special Bollywood Movie Songs
Sawan Special Bollywood Movie SongsDainik Gomantak
Sawan Special Bollywood Movie Songs
Sawan Special Bollywood Movie SongsDainik Gomantak

सगळ्यांना वाट असते ती श्रावण महिन्याची. या वर्षी श्रावण 14 जुलै 2022 पासून सुरू होत आहे जो 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, श्रावणाला हिंदी मध्ये सावन म्हणतात. आणि या सावन नावाची गाणी हिंदि सिनेसृष्टात खूप प्रसिद्ध आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये ही गाणी अतिशय सुंदर चित्रित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रेम, रोमान्स, नृत्य आणि पाऊस अगदी विलक्षण पद्धतीने दाखवण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या बॉलीवूड चित्रपटांतील 10 टॉप गाण्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Sawan Special Bollywood Movie Songs)

Ab Ke Sajan Saawan Mein
Ab Ke Sajan Saawan MeinDainik Gomantak

अब के साजन सावन में... (Ab Ke Sajan Saawan Mein)

1975 मध्ये आलेल्या 'चुपके चुपके' चित्रपटातील 'अब के बरस सावन में' या गाण्यात शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र श्रावणाच्या पावसात भिजतांना दिसत आहेत. हे गाणे जुने असेल तरी आजही रसिकांच्या ओठांवर आहे.

Lagi Aaj Sawan Ki
Lagi Aaj Sawan KiDainik Gomantak

लगी आज सावन की... (Lagi Aaj Sawan Ki)

चांदनी चित्रपटातील हे रोमँटिक गाणे विरहाची आठवण करून देणारे आहे. हे गाणे श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

Rimjhim Gire Saawan
Rimjhim Gire SaawanDainik Gomantak

रिमझिम गिरे सावन (Rimjhim Gire Saawan)

अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्या 'मिलन' चित्रपटातील रिमझिम गिरे सावन या गाण्यात दोघेही रोमँटिक अंदाजात पावसाचा आनंद लुटताना दिसले. त्यामुळे आजही बाहेर फिरायला जाणाऱ्याच्या गाडीमध्ये हे गाणे आवर्जून लावले जाते.

Pad Gaye Jhoole sawan rut aayi re
Pad Gaye Jhoole sawan rut aayi reDainik Gomantak

पड़ गए झूले सावन ऋतु आई रे (Pad Gaye Jhoole sawan rut aayi re)

1967 मध्ये आलेल्या बहू बेगम या चित्रपटातील पड़ गए झूले सावन ऋतु आई रे हे गाणे श्रावणातील सर्वात हिट गाणे मानले जाते. हे गाणे मीना कुमारी यांच्यावर चित्रित करताना आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी गायले होते.

Sawan Ko Aane Do
Sawan Ko Aane DoDainik Gomantak

सावन को आने दो (Sawan Ko Aane Do)

अरुण गोविल आणि जरीना वहाब यांच्या 'सावन को आने दो' या चित्रपटाचं हे टायटल सॉंग खूप प्रसिद्ध आहे, जे आजही पसंत केले जाते.

Sawan Ka Mahina
Sawan Ka MahinaDainik Gomantak

सावन का महीना (Sawan Ka Mahina)

नूतन आणि सुनील दत्त यांच्या 'मिलन' चित्रपटातील हे गाणे आजही खूप ऐकले जाते. गाण्याचे सुंदर बोल लोकांच्या हृदयाला भिडतात. आणि सहज ओठांवर येतात.

Haye Haye Yeh Majboori
Haye Haye Yeh MajbooriDainik Gomantak

हाय हाय ये मजबूरी (Haye Haye Yeh Majboori)

हाय हाय ये मजबूरी हे गाणे 'रोटी कपडा और मकान' चित्रपटातील आहे, ज्यामध्ये मनोज कुमार आणि झीनत अमानची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे गाणे इतके हिट झाले की नंतर त्याचे रिमिक्स देखील बनवले गेले.

Aya Sawan Jhoom Ke
Aya Sawan Jhoom KeDainik Gomantak

आया सावन झूम के (Aya Sawan Jhoom Ke)

श्रावणाचे हे सुंदर गाणे 'सावन' चित्रपटातील आहे. यामध्ये धर्मेंद्र आणि आशा पारेख दिसले. गाण्यात दोघेही पावसात जबरदस्त डान्स करताना दिसले.

Aaj Rapat Jaayen Toh hame Na uthaiyoo
Aaj Rapat Jaayen Toh hame Na uthaiyooDainik Gomantak

आज रपट जाए तो हमें न उठइयो (Aaj Rapat Jaayen Toh hame Na uthaiyoo)

नमक हलाल चित्रपटातील या गाण्यात स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांच्यातील जबरदस्त रोमान्स पाहायला मिळाला. गाण्यातील झमाझम पावसात स्मिताचा डान्सही पाहण्यासारखा होता. त्यामुळे सिनेरसिकांच्या आजही हे गाणे आवडीच्या लिस्ट मध्ये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com