लाटांच्या थरारावरील समुद्री सफर...

फेसबुकवर आपल्यापैकी कुणी आपण अनुभवलेल्या वॉटर - स्पोर्टसचे (Water - Sports) फोटो टाकले आहे असं क्वचितच दिसतं. पण या वाॅटर - स्पोर्टसचा अनुभव घेणे हे फार आनंदाचे असते.
लाटांच्या थरारावरील समुद्री सफर...
Water - Sports in Goa Dainik Gomantak

पर्यटन मोसम (Tourist season) गोव्यात (Goa) सुरु झाला की बागा कळंगुट, कांदोळीची किनार- रेषा पाण्यांवर डोलणाऱ्या वेगवेगळ्या वॉटर स्पॉर्टसशी संबंधीत असलेल्या नौका -बोटींनी रंगीत झालेली दिसते. आपण अशाही गैरसमजूतीत असतो की ह्या ‘बोट राइडस’ (Boat rides) फक्त पर्यटकांसाठी आहे. आपल्यापैकी बहुतेक गोमंतकीयांनी या ‘ॲडव्हेंचर स्पोर्टस’चा अनुभव घेतलेलाही नसतो. फेसबुकवर आपल्यापैकी कुणी आपण अनुभवलेल्या वॉटर - स्पोर्टसचे (Water - Sports) फोटो टाकले आहे असं क्वचितच दिसतं. पण या वाॅटर - स्पोर्टसचा अनुभव घेणे हे फार आनंदाचे असते. त्यासाठी एखादे दिवशी मुद्दाम ठरवून आपण समुद्रकिनाऱ्यावर जायलाच हवं.

Parasailing
Parasailing Dainik Gomantak

‘वॉटर - स्पोर्टस’मध्ये सर्वात थरारक आहे पॅरासेलिंग (Parasailing). आपण जर थोडे साहसी असाल आणि आपल्याला उंचीची भीती वाटत नसेल तर पॅरासेलिंग आपल्यासाठी अतिशय योग्य आहे. वेगाने जाणाऱ्या बोटीच्या गतीमुळे आपण एका पॅरेशुटसदृश्‍य फुग्याच्या दोरीला अडकून समुद्रावर उंच उडतो. या पॅरासेलींगमध्ये एकाच वेळी दोन माणसे समुद्राच्या पाण्यावरुन उंच उडण्याचा अनुभव घेऊ शकतात. अर्थात आपल्या सुरक्षिततेसाठी फ्लायर बांधलेले असतात.

Speed boating
Speed boatingDainik Gomantak

स्पीड बोटींग (Speed boating) हा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आपल्याला गतीने समुद्र सफर घडवणारा आणखीन एक प्रकार. सिनेमात नायक वेगाने खलनायकाचा स्पीडबोटने पाठलाग करत आहे हे दृश्‍य आपण अनेकदा पाहीलेले असेल. आपणही 15 ते 20 मैल प्रतिवेगाने स्पिड बोट समुद्रावर चालवू शकता. स्पीड बोटींचेही प्रकार असतात काही स्पीड बोटींवर फक्त एक किंवा दोन माणसेच बसू शकतात तर काही स्पीड बोटींवर आपण आपण चार पाच जणांचा ग्रुप घेऊनही जाऊ शकता. लांटावरच्या वेगाचा अनुभव घेण्यासाठी स्पीड बोट रायडींग एकदा तरी करावेच.

Jet ski riding
Jet ski ridingDainik Gomantak

जेट स्की रायडींग (Jet ski riding) साठी मात्र आपल्यापाशी कौशल्य हवे. आपली जर तयारी असेल तर आपण हे शिकूही शकता. कांदोळी, बागा आणि वागातोरच्या किनाऱ्यावर आपल्याला जेट स्की उपलब्ध आहे. ही थोडी महाग रायड आहे पण ती आपल्याला मजा आणते.

Tubing
TubingDainik Gomantak

रिंगो रायड ही सर्वात लोकप्रिय समुद्री रायड आहे. याला ट्युबींग (Tubing) या नावानेही ओळखले जाते. किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर ह्या ट्यूब जेव्हा उलटल्या जातात तेव्हा त्यावरुन खाली पडणाऱ्यांचा जल्लोष ऐकण्यासारखा असतो.

पर्यटकांना यातल्या बहुतेक वॉटर- स्पॉर्टसची नावे माहीत असतात पण आपण गोमंतकीयच त्यापासून अनभिज्ञ असतो. जेव्हा आपण या पर्यटन मोसमात समुद्रावर जाल तेव्हा नुसते किनाऱ्यावर पाय भिजवण्यापुरते जाऊ नका. थोडासा अधिक वेळ घ्या पण छोटासा का होईना समुद्र सफरींचा आनंद लुटा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com