IND vs SA: दमदार ऋषभचे जोरदार शतक!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावून टीम इंडियाला कठिण परिस्थीतून काढले बाहेर
Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने शानदार खेळी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावून टीम इंडियाला (Team India) कठिण परिस्थीतून बाहेर काढले. तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात पहिल्या दोन षटकांत दोन गडी गमावले मात्र त्यानंतर क्रीजवर आलेल्या ऋषभ पंतने जोरधार धावा केल्या आणि लंचच्या आधीच अर्धशतक केले.

Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak

पहिल्या डावात आपल्या 27 धावा करणाऱ्या पंतने दुसऱ्या डावात कसोटी कारकिर्दीतील केवळ 58 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले 8 वे अर्धशतक पूर्ण केले. ऋषभ पंतचा हा 28 वा कसोटी सामना असून. ऋषभ पंतचे हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak
Rishabh Pant
U19 World Cup: 46 धावांत ऑलआऊट...टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच 'हा' संघ ढेर

दक्षिण आफ्रिकेत ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर 50 पेक्षा जास्त डाव खेळले. पंतने यापूर्वी ऑस्ट्रेलियात 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली, तर इंग्लंडमध्ये 1 शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी शतके झळकावण्याचा ऋषभ पंत हा एकमेव भारतीय विकेटकीपर आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant Dainik Gomantak

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे लवकर बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या पंतने कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) अर्धशतकी भागीदारी करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. या दोघांनी लंचच्या आधीच नाबाद 72 धावांची भागीदारी केली तर एकट्या पंतने 51 धावा काढल्या

Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com