Press Freedom Day : या कलाकारांनी केलेली पत्रकाराची भूमीका आजही चाहते विसरले नाहीत

आज पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस... लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला बॉलिवूडनेही सलाम केला आहे.
Press Freedom Day
Press Freedom DayDainik Gomantak
Published on

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी जनता आणि सरकार यांच्यातला संवादाचे माध्यम म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं.

पत्रकारांच्या कामाची भुरळ कित्येकदा फिल्ममेकर्सनाही पडली. आणि त्यातुनच निर्माण झाले काही असे चित्रपट आणि त्यातली पात्रं ज्यांनी आजही आज पत्रकार स्वातंत्र्य दिवस त्यानिमित्ताने पाहुया असे काही कलाकार आणि त्यांच्या कलाकृती जे आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. चला पाहुया ते कलाकार आणि त्यांचे चित्रपट

1. दिलीप कुमार

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या दिलीप कुमार यांनी 'मशाल' चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली होती. दिलीप कुमारच्या चित्रपटात मुंबईतून गुन्हेगारीचे उच्चाटन करणे हे त्यांचे ध्येय होते.

Deelip Kumar
Deelip KumarDaink Gomantak

2.अनिल कपूर (नायक )

'नायक' चित्रपटातील अनिल कपूरची व्यक्तिरेखा कोणीही विसरू शकत नाही. चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारण्यापूर्वी अनिल कपूरने पत्रकाराची भूमिका साकारली होती. आपल्या जीवाची पर्वा न करता लोकापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी धडपडणारा एक धाडशी पत्रकार अनिल कपूरच्या नायकमधुन प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

Anil Kapoor
Anil KapoorDainik Gomantak

3.शाहरुख खान (फिर भी दिल है हिंदुस्तानी)

शाहरुख खानने आपल्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. शाहरुख खानने 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली होती. एका प्रामाणिक व्यक्तीवर असलेला देशद्रोहाचा खटला कसा होता? हे दाखवण्यासाठी आपलं पत्रकारितेचं कौशल्य पनाला लावणारा एक प्रामाणिक पत्रकार शाहरुखने या चित्रपटात साकारला आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

4.करीना कपूर (सत्याग्रह)

करीना कपूरने 'सत्याग्रह' चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात करीना कपूरची व्यक्तिरेखा तिच्या चाहत्यांना खूपच आवडली होती. देशातल्या भ्रष्टाचाराविरोधात पत्रकारांनी भूमीका घेतली तर ते किती महत्त्वाचं ठरू शकतं यावर सत्याग्रह चित्रपटांतुन भाष्य करण्यात आलं आहे.

Kareena Kapoor
Kareena KapoorDainik Gomantak

5. नर्गिस फाखरी (मद्रास कॅफे)

'मद्रास कॅफे' या चित्रपटात नर्गिस फाखरीने पत्रकाराची भूमिका साकारली होती. नर्गिस फाखरी यांचा हा चित्रपट हेरगिरी, राजकीय आणि लष्करी पार्श्वभूमीवर आधारित होता. या चित्रपटात जॉन अब्राहमच्या भूमीकेचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

Nargis Fakhari
Nargis Fakhari Dainik Gomantak

6.राणी मुखर्जी

'नो वन किल्ड जेसिका' या चित्रपटात राणी मुखर्जीने पत्रकाराची भूमिका साकारली होती. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटात राणी मुखर्जीने जेसिका लाल यांना न्याय मिळवून दिला आहे. राजकिय मुजोरी न्यायाचा गळा घोटून राजरोसपणे कशी फिरते यावर हा चित्रपट खूप सुंदर भाष्य करतो. या चित्रपटात एका अस्वस्थ पत्रकाराची भूमीका करताना राणी मुखर्जी नेहमीप्रमाणे उठुन दिसली आहे.

Rani Mukerjee
Rani Mukerjee Dainik Gomantak

7. जुही चावला

जुही चावलाही या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसली आहे. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' या चित्रपटात जुही चावलाने पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातला शाहरुखसोबतचा तिचा रोमान्स प्रेक्षकांकडुन खूप पसंत केला गेला.

Juhi Chawla
Juhi Chawla Dainik Gomantak

8. कोंकणा सेन शर्मा

'पेज 3' चित्रपटात कोंकणा सेन शर्माने पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील कोंकणा सेन शर्माच्या कामाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातुन कोंकणा सेनने आपल्यातल्या एका कसलेल्या अभिनेत्रीचं चुणूक दाखवुन दिली.

Konkna Sen -Sharma
Konkna Sen -SharmaDainik Gomantak

9.प्रिती झिंटा

'लक्ष्य' चित्रपटात प्रिती झिंटाने पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रिती झिंटा कारगिल युद्ध कव्हर करताना दिसत आहे.

Priety Zinta
Priety Zinta Dainik Gomantak

10.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com