
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
आणि आज कोर्टाने तिला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली आणि आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल तिच्यावर टीका केली, राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणी अभिनेत्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोण आहे केतकी चितळे: केतकी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे जीने स्टार प्रवाहच्या आंबत गोड, ZEE5 च्या तुझा माझा ब्रेकअप आणि सोनी टीव्हीच्या सास बिना ससुराल या टीव्ही शोमध्ये काम केले. केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे जास्त चर्चेत असते.
फेसबूक पोस्टमुळे चर्चेत: अभिनेत्री केतकी ही तिच्या एपिलेप्सीवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, या आजारामुळे तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. केतकी या आजारावर उपचार घेत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला 'एपिलेप्टिक वॉरियर क्वीन' असे नाव देखील दिले आहे. ऍसेप्ट एपिलेप्सी या संस्थेची ती संस्थापक आहे.
बिग बॉसमध्ये प्रवेश करणार होती: महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेल्या बिग बॉस मराठी 3 या रिअॅलिटी टीव्ही शोचा ती एक भाग असेल अशी बातमी देखील आली होती, परंतु टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना तिने या अफवांचे खंडन केले
केतकीवर गुन्हा दाखल : केतकीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये विविध धर्म आणि पंथांचा उल्लेख करत लिहिले होते, त्यामुळे नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील एका कार्यकर्त्याने केतकीविरोधात नव-बौद्ध धर्मावर भाष्य केले होते यासाठी दाखल त्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून झाली ट्रोल: स्टँडअप कॉमेडियन अद्वन्या जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकावर भाष्य केले. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
या घटनेबद्दल त्यांनी आधीच माफी मागितली होती. मात्र यानंतर केतकी चितळे यांनी कोणत्याही उपाधीशिवाय एका शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.
महाराजांनी दिलेली शिकवण विसरून त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करत आहे, अशी पोस्ट तिने केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.