जनसेवा अर्बन कॉ. सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सहकार क्षेत्र जगातील विश्‍वासावर चालणारी चळवळ: मंत्री गोविंद गावडे

नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस म्हणाले की, गरजेच्या वेळी घेतलेला पैसा वेळेवर परत केल्यास तोच पैसा इतरांच्या गरजांना वापरता येतो त्यातूनच ग्राहक व बॅंक यांचे नाते भक्कम होत असते.

 

सांगे : सहकार क्षेत्र जगातील विश्‍वासावर चालणारी चळवळ असून ज्यादा व्याज मिळविण्याच्या हव्यासापोटी ग्राहकांनी आपल्या ठेवी ठेवताना जरूर विश्वासाहर्ता तपासण्याचा सूचक सल्ला सांगेतील जनसेवा अर्बन कॉ. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्‍घाटन केल्यानंतर ग्राहकांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी दिला.

यावेळी व्यासपीठावर सांगेचे आमदार प्रसाद गावकर, नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस, जनसेवा सोसायटीचे चेअरमन वासुदेव बोन्डाईकर, माजी आमदार वासुदेव गावकर, नगरसेवक संजय रायकर, प्रकाश गावकर, सहकार निबंधक विकास गावणेकर, जनसेवेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

पुढे बोलताना सहकार मंत्री म्हणाले की, आर्थिक मंदीच्या वादळात अनेक आर्थिक संस्था कोलमडल्या पण जनसेवा अर्बन आपले पाय घट्ट रोवून सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहून जनहित सांभाळून कार्य करीत असल्याबद्दल जनसेवेचे अभिनंदन केले. घाई गडबड न करता आर्थिक व्यवहार हाताळीत असल्यामुळे ग्राहकांची मने जोडली आहे. प्रामाणिकपणे व्यवहार केल्यास विस्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.

सांगेच्या विकास कामासंदर्भात बोलताना, ते म्हणाले की सांगे मतदारसंघात निसर्ग पर्यटन मार्गा लावण्यासाठी व मूलभूत गोष्टी पुरविण्यास आपला सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करीत जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर सांगेच्या रवींद्र भावनांची पायाभरणी करण्यात येणार असल्याचे सांगून जनसेवा अर्बन सोसायटीची भरभराट होवो, अशा शुभेच्छा दिल्या.

आमदार प्रसाद गावकर म्हणाले रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले याचे खरे श्रेय ग्राहक, भागधारक, कर्मचारी आणि संचालक मंडळाला जात आहे. परत फेड व्यवस्थित केल्यास बॅंक आणि ग्राहक यांचे संबंध चांगले रहात असतात. जनसेवा अर्बन चा विस्वास चांगला आहे तो अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

सहकार निबंधक विकास गावणेकर म्हणाले की, गरजवंतांना मोठ्या धनाड्य लोकांकडे हात पसरू नये, यासाठी आर्थिक संस्था उदयास आल्या त्यांचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे चेअरमन वासुदेव बोन्डाईकर यांनी स्वागत केले. प्रकाश गावकर यांनी सूत्रसंचालन तर व्हाईस चेरमन संतोष गावकर यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

संबंधित बातम्या