सुर्ला - सावईवेरे पूल लवकरच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

सावईवेरे शाळा उद्‍घाटन

सावईवेरेतील शाळेची पायाभरणी

सावईवेरे येथील सरकारी प्राथमिक शाळा कामाची पायाभरणी कार्यक्रम झाल्‍यावर विद्यार्थी व ग्रामस्‍थांसमवेत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला मंत्री गोविंद गावडे, शिक्षक व ग्रामस्‍थ.

 
पणजी : मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला व संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्‍या उपस्‍थितीत सावईवेरे येथे सरकारी प्राथमिक शाळेची पायाभरणी केली. जिल्‍हा पंचायत, पंचसदस्‍य, पालक, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यावेळी उपस्‍थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनी सुर्ला ते सावईवेरे असा पूल उभारण्‍यासाठी सरकार सर्व ते प्रयत्‍न करीत असल्‍याचे सांगितले.

या पुलामुळे लोकांमध्‍ये चांगले संबंध जुळण्‍यास मदत होणार असल्‍याचे ते म्‍हणाले. मूळ शिक्षण घैण्‍यासाठी सरकारी प्राथमिक शाळा हे उत्‍कृष्‍ट ठिकाण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.पायाभूत सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत असल्‍याचे त्‍यांनी पुढे सांगितले.यावेळी शाळेतील मुलांसमवेत, शिक्षक, पालकवर्ग व ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.
 

 

 

 

 

 

 

राज्याच्या अर्थसंकल्प आकडेवारीत गौडबंगाल

संबंधित बातम्या