इक्विटी म्युच्युअल फंडाकडे वाढला ओघ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई: म्युच्युअल फंडांच्या ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील योजनांमधील गुंतवणुकीत फेब्रुवारी महिन्यात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीत ओपन एंडेड इक्विटी फंड योजनांमध्ये 10 हजार 976 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही मार्च 2019 नंतरची सर्वाधिक वाढ आहे.

लार्ज कॅप, मल्टी कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडांमध्ये 1 हजार 400 कोटी ते 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सेक्‍टोरल आणि थिमॅटिक प्रकारातील फंडांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारीमध्ये या प्रकारातील योजनांमध्ये 3.8 कोटी रुपयांची वाढ झाली होती, तर फेब्रुवारीमध्ये सेक्‍टोरल आणि थिमॅटिक प्रकारातील फंडांमध्ये 1 हजार 928 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) सुमारे सातपटीने वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 202 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ही गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये 1 हजार 483 कोटी रुपयांवर पोचली आहे. मात्र, हायब्रीड फंडांमधील गुंतवणूक काढून घेण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला आहे. डेट फंडांच्या बाबतीत क्रेडिट रिस्क फंडांकडून कॉर्पोरेट बॉंड फंड, बॅंकिंग आणि पीएसयू डेट फंडांकडे कल वाढलेला दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात व्होडाफोन-आयडियाच्या पतमानांकनात घट झाल्यामुळे डेट फंडांमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली.

संबंधित बातम्या