रोगप्रतिकार शक्ती हि हवीच कारण !

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कोरोना टाळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवा : व्यंकटेश हेगडे

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मडगाव शाखेने कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करण्यासाठी मडगावच्या रविंद्र भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असून योग्य उपाय केले नाहीत किंवा योग्य जबाबदारी घेतली नाही तर माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मात्र ज्याला कोरोना व्हायरसची लागण लागली आहे त्याचा मृत्यू होतोच असेही नाही.

फातोर्डा : जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे वैज्ञानिक या कामात पूर्ण गुंतले आहेत. मात्र अजून त्यांना यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत हा गंभीर विषाणू टाळण्यासाठी प्रत्येकाने शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची अत्यंत गरज आहे, असे मत डॉ. व्यंकटेश हेगडे व डॉ. साई स्पूर्ती नायक यांनी व्यक्त केले.

या रोगाची लक्षणे म्हणजे सर्दी होणे, खोकला येणे, घसा, अंग दुखणे, ताप येणे अशी साधीच असली तरी श्‍वसनाचा त्रास सुरू होतो, फुप्फुसांवर परिणाम होतो. तेव्हा तातडीने तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते.

एकदा या विषाणूची लागण झाली की १४ दिवसांनी त्याचे परिणाम दिसून येतात. गोव्यात पर्यटकांची ये-जा असल्याने प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे असल्याचे या दोन्ही डॉक्टरांनी सांगितले.

ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते किंवा मधुमेह झाला असेल किंवा धुम्रपान करणाऱ्यांना, लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना, वडिलधाऱ्यांना याची लागण लवकर होऊ शकते. हा व्हायरस टाळण्यासाठी हाताची स्वच्छता राखणे, नियमितपणे हात धुणे, नाका-तोंडाला मास्क बांधणे, गर्दीत जाण्याचे टाळणे, चिकन, मटण,अंडी, मासे पूर्ण शिजवून खावीत.

या विषाणूची लागण झाल्याचे निदान करणे या घडिला तरी अवघडच आहे. भारतात पुणे येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेला नमुने तपासण्य़ाची मान्यता दिलेली आहे. कोरोना व्हायरसाची लागण झालेल्यावर केवळ सहाय्यक उपचारच करावे लागतात. यासाठी अॅंटी व्हायरस थेरपीचा शोध लागलेला नसल्याचे त्यामुळे नियमित योगा करणे योग्य ठरेल असे या डॉक्टरांनी शेवटी सांगितले

हेही वाचा : तुम्हालाही सतत चक्कर येतात का ?

संबंधित बातम्या