देशाची आर्थिक स्थिती २०२० मध्ये सुधारेल 

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

फातोर्डा: माजी गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांना विश्वास 
२०१९ पेक्षा २०२० मध्ये भारताची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे माझी गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला.गोमंत विद्या निकेतनने आयोजित केलेल्या विचारवेध व्याख्यानमालेचे त्यांनी यंदाचे शेवटचे पुष्प गुंफले,त्यावेळी ते बोलत होते. 

फातोर्डा: माजी गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांना विश्वास 
२०१९ पेक्षा २०२० मध्ये भारताची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे माझी गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला.गोमंत विद्या निकेतनने आयोजित केलेल्या विचारवेध व्याख्यानमालेचे त्यांनी यंदाचे शेवटचे पुष्प गुंफले,त्यावेळी ते बोलत होते. 
जरी जागतिक स्थरावर आर्थिक मंदी असली,तरी भारतात तशी मोठ्या प्रमाणात ती जाणवली नाही.सरकारनी योग्यवेळी योग्य ते उपाय योजून व अमलात आणून आर्थिक व्यवस्थेला धोका पोहचू दिला नसल्याचे डॉक्टर पटेल यांनी सांगितले.जागतिक स्तरावरली तशी भीतीदायक आर्थिक स्थिती नसल्याचे ते म्हणाले.जगात आर्थिक स्थितीवर परिणाम होण्यासाठी अमेरिका व चीन या देशामधील व्यापार युद्धे हे एक कारण असल्याचे ते म्हणाले.पण अमेरिका युरोप जपानमधील बँकांनी सूक्ष्म आर्थिक धोरण तशेच वित्तीय धोरणाला सहकार्य केल्याने अपेक्षित आर्थिक परिस्थितीला धोका पोहचला नाही,असेही ते म्हणाले. 

इराण,अमेरिका या देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे त्याचा जागतिक आर्थिक स्थितीवर परिणाम होईल,अशी भीती होती.पण गेल्या एक दोन आठवड्यामध्ये दोन्ही देशामधील तणावांमध्ये शिथिलता आल्याने यात सुधारणेसाठी व असल्याचे ते म्हणाले.शिवाय या दोन्ही देशांमधील तणावामुळे भारताला झळ पोहचू शकली असती.तशीही परिस्थिती सध्यातरी दृष्टीक्षेपात नसल्याचे डॉ पटेल यांनी स्पष्ट केले.राहुल पै पाणंदीकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला व अनेक प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरेही दिली. 

आयटी क्षेत्रासाठी गोव्यात पूरक वातावरण 
गोव्याचे दरडोई उत्पन्न चांगले असल्यानाने कोणीही हेवा करावा अशी स्थिती आहे.शिवाय व्यापारी संकुलाची किंमतही पुष्कळ कमी आहे.गोवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.सरकारने महागाई वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचली आहेत.काही बँकांची पत वाढ अतिजलद झाल्याने एनपीए चा प्रसंग ओढवला.पण गेल्या दोन वर्षात बँकांतील एनपीए ची स्थिती सुधारली असल्याचेही ते म्हणाले. 

संबंधित बातम्या