दुबईत महिलांकडून भारतीय संस्कृती, संस्काराची गुढी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

इंटरनॅशनल सद्‌गुरू फाऊंडेशन-युएई काउन्सिल आंतरराष्ट्रीय धर्मगुरू -विश्वशांती दूत ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने भारतीय संस्कृती संरक्षणार्थ दुबईमध्ये कार्यरत आहे.

खांडोळा: इंटरनॅशनल सद्‌गुरू फाऊंडेशन-युएई काउन्सिल आंतरराष्ट्रीय धर्मगुरू -विश्वशांती दूत ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने भारतीय संस्कृती संरक्षणार्थ दुबईमध्ये कार्यरत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील सण उत्सवांमागील उद्देशाला अनुसरून दुबईमध्ये भारतीय बांधवांना संघटित करून विविध कार्यक्रम युएई विभागातर्फे संपन्न होत असतात.

हळदी कुंकुम उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम कान्सिलतर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना तसेच सद्गुरु वंदनेने करण्यात आली. कुमार विहान, कुमारी नव्या व तृप्ती साळगावकर यांनी यामध्ये सहभाग घेतला. हळदी कुंकुम हा सण म्हणजे महिलांनी एकत्रित येऊन, एकमेकांबरोबर संवाद साधून, आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी इतरांना देऊन आनंद अनुभवायचा सण. हा उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये गोव्याचे लोकप्रिय लोकनृत्य पारंपारिक धालो, मिलन फडते, तेजस्विनी राणे, पूनम कांदोळकर, मेधा पराशय, नेहा सुकेश, स्नेहा पालकर, स्नेहा लामगावकर, सोनल देसाई, प्रीतम मंद्रेकर, सबिना साळगावकर, तन्वी नागवेकर या कौन्सिलच्या महिलांनी सादर केले.

याप्रसंगी नेहा व राजेश्री यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध खेळामध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. तसेच प्रजासत्ताक दीना निमित्त स्नेहा पालकर यांनी स्पॉट क्विझ संपन्न केला. पूनम कांदोळकर व सोनल देसाई यांच्या नेतृत्वाने खास करून लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

महिला शाखेतर्फे तपोभूमी इंग्रजी दिनदर्शिका २०२० चा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने होत असलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्य तसेच हळदी कुंकू सणाचे महत्त्व तन्वी नागवेकर यांनी कथन केले.

सदर कार्यक्रमाला १०० हून अधिक लोकांचा प्रतिसाद लाभला,या कार्य क्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम मांद्रेकर

तर आभार प्रदर्शन राजश्री राणे यांनी केले. सर्वांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या अशा या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी सजावट, रांगोळी आणि प्रजासत्ताक दिनाची थीम काजल फडते आणि स्नेहा लामगावकर यांनी उत्कृष्टरित्या आखली होती.
 

संबंधित बातम्या