तुडुंब गोदामे तरी रिकामी पोटे

 डॉ ज्ञानेश्वर मुळे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

मानवाधिकार: भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या कोषांबी परिसराला मी नुकतीच भेट दिली.कोषांबी हे अलाहाबाद पासून साधारण सव्वातासाच्या अंतरावर आहे.तिथे उतरल्यानंतर बुद्धांची संबंधित विहार आहेत ते पाहिले त्यानंतर बुद्ध काळातील म्हणजे जवळजवळ अडीच हजार चार वर्षांपूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष पाहिले हे सगळे पाहत असताना खरोखरच तो काळ किती विकसित होता याची कल्पना करू शकलो तो सगळा परिसर रम्य आहे.जवळच यमुनेचे भव्य पात्र आहे पण दोन अडीच तासात सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट कुठली असेल तर आम्ही भेट दिली त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावातली किंवा आसपासची लहान मुले भीक मागत होत

मानवाधिकार: भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या कोषांबी परिसराला मी नुकतीच भेट दिली.कोषांबी हे अलाहाबाद पासून साधारण सव्वातासाच्या अंतरावर आहे.तिथे उतरल्यानंतर बुद्धांची संबंधित विहार आहेत ते पाहिले त्यानंतर बुद्ध काळातील म्हणजे जवळजवळ अडीच हजार चार वर्षांपूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष पाहिले हे सगळे पाहत असताना खरोखरच तो काळ किती विकसित होता याची कल्पना करू शकलो तो सगळा परिसर रम्य आहे.जवळच यमुनेचे भव्य पात्र आहे पण दोन अडीच तासात सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट कुठली असेल तर आम्ही भेट दिली त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावातली किंवा आसपासची लहान मुले भीक मागत होती जिथे आम्ही जात होतो तिथे आमच्याबरोबर ती येत होती त्यातल्या एकाला विचारले की पैसे घेऊन करणार काय तुम्ही त्यावर तो म्हणाला 'आम्हाला बिस्किट हवय ' तीन-चार ठिकाणी छोट्या-मोठ्या मुलांचे असे समूह भेटले.प्त्येकजण पैसे मागत होता आणि पैशाचे काय करणार असे विचारल्यावर ते म्हणत होते,'बिस्कीट खाणारं ' मला काही कळले नाही याचा अर्थ काय! पण एवढे निश्चित लक्षात आले की या भागात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे.एका बाजूला भारत अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करतो आहे.त्याच पार्श्वभूमीवर देशात बिकट भुकेची समस्या आहे.मानवी हक्क आयोगा मध्ये अन्नाचा अधिकार या विषयावरही काम केले जाते प्रत्येकाला भुकेपासून  स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. प्रत्येकाला पुरेसे अन्न आवश्यक आहे.माणसाला निवारा नसला तरी काही दिवस चालू शकते. पुरेश्या वस्त्राशिवाय तो जगू शकतो पण अण्णा शिवाय जगणे शक्य नाही.असे असले तरी एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाबाळांना आपण पुरेसे खायला देत नाही.आणि देशातील गोदामे धान्याने भरून वाहत आहेत,केवढा हा अंतर्विरोध आहे! जगण्याचा आणि आत्मसन्मानाचा हा एवढा कठीण का व्हावा ?आपल्या लोकशाहीला अजून अशी अनेक छिद्रे आहेत. 
चांगल्या आरोग्यसेवेचा हक्क
दुसरे एक वेगळे उदाहरण आहे गोष्ट ओडिशामधल्या कुष्ठरोगाच्या वसाहतीची.५ मे 2011 रोजी मानवाधिकार आयोगाकडे सुदर्शन बिस्वाल यांनी एक तक्रार पाठवली.ती सुंदर पाडा जिल्ह्यातल्या गोखी बाबा लेप्रसी कॉलनी बाबत होती.तक्रार होती कि या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना वीजपुरवठा होत नाही,पक्की घरे नाही ,स्वच्छतागृहांची व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचे ज्या जागेवरती राहतात त्या जागेची मालकी त्यांच्याकडे नाही.या तक्रारदाराने आयोगाचे लक्ष त्याकडे वेधले होते आता आयोग या सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करतो आहे.आपण हे विसरतो की चांगल्या आरोग्यसेवेचा हक्क हेसुद्धा लोक शाही मध्ये आहे.अलीकडेच शकुंतला भालेराव आणि डॉक्टर अभिजित मोरे यांनी 'होरपळ 'या नावाचं पुस्तक संपादित केल आहे.या पुस्तकामध्ये खाजगी रुग्णालयात झळा सोसलेल्या मुलांच्या अत्यंत हृदयद्रावक कथा आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांनी संपादकांना सांगितलेल्या गोष्टींवर हे पुस्तक आधारित आहे.या पुस्तकातील सर्व घटना सत्य आहेत.असे संपादकांनी स्पष्ट केले आहे.डॉक्टर आणि रुग्णालये यांच्यावर टीका करण्यात या पुस्तकाचा उद्देश नाही तर बेबंद बाजारीकरण झालेल्या आरोग्य क्षेत्रातील रुग्णाची होरपळ, घुसमट पुढे आणि चांगल्या आरोग्य व्यवस्थितेचि खासगी रूग्णालयांच्या, नियमांची तक्रार निवारणयंत्रणेची मागणी बळकट करणे हाच त्यामागे उद्देश आहे.
चांगल्या गोष्टींचे अनुकरण व्हावे
आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल तर चांगली आरोग्य सेवा जितकी आवश्यक आहे, तितकेच चांगले डॉक्टर , चांगल्या नर्स आणि समाजसेवेची भावना घेऊन काम करणाऱ्या रुग्णालयांची गरज आहे .या क्षेत्रातहि काही आहे संस्था लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. त्यांची नावे अशी ऑल इंडिया पेशंट राइट्स , पेशंट फॉर बेटर ट्रीटमेंट, हेल्थ वॉच लखनौ, जनस्वास्थ्य अभियान गुजरात, मुंबई सिटीजन डॉक्टर फोरम , सेंट्रल फोर ऍडव्हान्स अँड रिसर्च दिल्ली.  या संस्था रुग्णांचा छळ होऊ नये किंवा त्यांचे शोषण होऊ नये यासाठी प्रयत्न करतात याचा अर्थ डॉक्टरांची स्वतःची अशी बाजू नाही असे होत नाही त्यांची ही एक बाजू आहे आणि ती ऐकून घेणे गरजेचे आहे.  एकंदरीतच स्वास्थ हे स्वार्थाच्या चक्रातून बाहेर पडत नाही ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे लोकशाहीमध्ये आरोग्यसेवा अधिकार असेल तर आपण आजही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवु शकलेलो नाही ही खरी शोकांतिका आहे.
सध्या अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू आहे . या महाभियोगामध्ये त्यांच्याविरुद्ध सत्तेचा आणि काँग्रेस कामांमध्ये अडचणी उत्पन्न करणे असे दोन आरोप ठेवले गेले आहेत. काँग्रेसमध्ये निर्णय अध्यक्षयांविरुद्ध गेला .हा विषय आत सीनेटमध्ये  चर्चेला येईल.मला असे वाटते की अमेरिका हा आज जगातील सर्वात प्रगत देश आहे .तेथे सगळ्यात चांगली  लोकशाही आहे असे म्हणले जाते. अशा देशात सुद्धा सामान्य माणसाच्या अधिकारावर मग तो माहिती अधिकार असो ,जगण्याचा अधिकार असून किंवा चांगल्या प्रशासनाचा अधिकार असो त्यावर अशा प्रकारे गदा  येते, आक्रमण होते पण विचारण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला देखील आहे.ही गोष्ट महाभियोगाची निमित्ताने स्पष्ट होते उच्च पदावर आसनस्थ  व्यक्ति विरुद्ध तक्रार करता येते आणि महाभियोग चालवता येतो हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.आपल्याकडे राजकीय नेत्यावर आरोपपत्र दाखल झाले तरी त्याच्यावर गुन्हा सिद्ध करणे अवघडच नव्हे ,तर अशक्य असते भारतात किती सहजासहजी शासकीय प्रक्रियेतून गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले. जातात या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये ट्रंप यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाची एक वेगळे वैशिष्ट आहे.लोकशाहीचे जे जाणकार आहेत त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे,अभ्यास केला पाहिजे आणि त्यातील अनुकरणीय गोष्टी इथे राबवल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या