देशातील पहिल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण

India's first concrete floating jetty on river Mandovi inaugurated
India's first concrete floating jetty on river Mandovi inaugurated

पणजी : देशातील जलमार्गांचा वापराला प्राचिन इतिहास आहे. सध्या उपयोगात असलेल्या वाहतूक व्यवस्थेला काही मर्यादा आहेत, त्यामुळे अधिकत जलमार्गांचा वापर होणे गरजेचे आहे. जलमार्गामुळे इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे मत केंद्रीय जहाजबांधणी आणि केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी व्यक्त केले.

आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यातर्फे देशातील पहिल्या तरंगत्या जेटीचे मांडवी नदीमध्ये लोकार्पणप्रमसंग मंडविया बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर, बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, नदी परिवहन खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी आणि बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांची उपस्थिती होती.

मंडाविया म्हणाले की, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीत आता अडथळे येऊ लागले आहेत. या सुविधांवर काही मर्यादा आहेत, त्यामुळे जलमार्गांचा वापर वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशाला ७, ५०० किलोमीटर किनारपट्टी लाभली आहे. त्याचा वापर वाहतुकीसाठी होणे गरजेचे असून, गोव्यात जलमार्गांसाठी विशेष सुविधा तयार आहेत आणि यापुढे केल्या जाणार आहेत. जलमार्गांमुळे अर्थव्यवस्थेबरोबर रोजगारांचाही प्रश्‍न सोडविण्यास मदत होईल. तरंगत्या जेटीमुळे जलमार्गावरील वाहतूक वाढविण्यास मदत होणार आहे. अशा जेटी उभारण्यासाठी कोणत्याही पर्यावरण दाखल्याची गरज नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या जेटी सहज हटविता येणाऱ्या असून, त्या काँक्रीटच्या असल्यामुळे लोकांसाठी त्या सुरक्षित आहेत.

देशातील पहिली तरंगती जेटी गोव्यात होत असून, अशा प्रकारच्या आणखी तीन जेटी गोव्याला दिल्या जाणार आहेत.मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात एखादा नवा प्रकल्प येत असला की बिगरसरकारी संघटनांतर्फे (एनजीओ) विरोध केला जातो. योग्य नियोजन केल्यास गोव्यात जलमार्गांचा चांगल्यारितीने वापर करता येऊ शकतो. जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास राज्यातील खाण व्यवसाय बंद झालेल्या बार्जमध्ये काहीसा फरक करून त्या वाहतुकीसाठी वापरात येऊ शकतात. त्याशिवाय मुरगाव पोर्ट ट्रस्टचा वापर हा केवळ ५० टक्केच होत असून, जलवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे शक्य होऊ शकतो. देशात कोस्ट व्हिक्टोरिया क्रूझ कंपनी जे प्रमाणपत्र व्यवसाय सुरू करणार आहे, त्याचे केंद्र गोव्यात सुरू करण्याची जी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे, त्यामुळे राज्यातील दोन हजार युवकांना त्याचा फायदा होणार आहे.

मायकल लोबो यांनी दुबई शहरात ज्याप्रमाणे नैसर्गिक जलमार्गांचा वापर केला जातो, तसा वापर होणे आवश्‍यक आहे. केंद्र सरकारला आम्ही ३० प्रस्ताव पाठविले असून, त्यातून राज्यातील गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर पणजीत धेंपो हाऊससमोर, जुने गोवा आणि शापोरा येथे शापोरा नदीत अशा आणखी तीन तरंगत्या जेटी काही महिन्यात निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी केंद्र सरकारने ९.५ कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिव पी. एस. रेड्डी यांनी स्वागत केले आणि कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांनी आभार मानले.

तरंगत्या जेटीचे फायदे
राज्यात आणखी तीन तरंगत्या जेटींची निर्मिती केली जाणार आहे. या जेटींसाठी कोणत्याही पर्यावरणीय दाखल्याची गरज नाही. या जेटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हटविता येऊ शकतात. जेटीमुळे परदेशातील पर्यटकांना बोटी उभा करणे सोयीचे होईल, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com