इंडोको रेमिडीजच्या महसूलात १४ टक्के वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

वेर्णा:इंडोको रेमिडीजच्या महसुलात आर्थिक वर्ष २०१९-२० च्या तिसऱ्या तिमाहीत १४ टक्के वाढ झाली आहे. मागच्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ दिसून आली.याबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालिका आदिती पाणंदीकर यांनी सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेतील व्यवसाय १७ टक्के वाढला असून परदेशी बाजारपेठेतील व्यवसायात २१ टक्के वाढ झाल्याने एकूण महसुलात वाढ झाली आहे.आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित कष्टाचे हे फलित आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

इंडोको रेमिडीज अनेक प्रकारची औषधे बनवीत असून यूके यूएस मधील जागतिक प्रमाणानुसार आमच्या प्रयोगशाळा, उत्पादन, पॅकिंग होत आहे आणि तेथील तपासणी निकषांचे आम्ही काटेकोरपणे पालन करतो, त्यामुळेच हे यश संपादन करणे शक्य होत आहे, असे त्यांनी सांगितले.

पेडणे तालुक्याला लवकरच मुबलक पाणी

संबंधित बातम्या