सर्वाधिक जास्त 35 कोटी खर्च करून पेडण्यात बांधलेला इंडोर स्टेडीयम उद्घाटनासाठी सज्य  

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पेडण्यात इनडोअर स्टेडियम उद्‍घाटनासाठी सज्ज

राष्ट्रीय खेळामुळे नवीन क्रीडा संकुले उभारण्यात येत आहेत. हे मैदान पेडणे शहराची छान वाढवणार आहे. यापूर्वीच्या क्रीडा मंत्र्यांनी कधीच पेडणे तालुक्यातील क्रीडा मैदाने तेथील साधन सुविधा यावर लक्ष दिले नाही.

मोरजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, पण पेडणे तालुक्यात सर्वाधिक खर्च करून सावळवाडा येथे ३५ कोटी रुपये खर्च करून इनडोअर स्टेडियम क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांच्या प्रयत्नातून उभारला असून तो प्रकल्प आता उद्‍घाटनासाठी सज्ज झाला आहे.

मात्र मागच्या दहा वर्षापूर्वी क्रीडामंत्री म्हणून बाबू आजगावकर झाले, त्यावेळी त्यांनी प्रथम धारगळ येथे क्रीडा नगरीसाठी जागा संपादित केली. मात्र त्या ठिकाणी क्रीडा नगरी उभारण्यास त्यांना यश आले नाही, आता त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगावकर प्रयत्नशील आहेत.

नॅशनल स्पर्धा मागच्या काही वर्षापासून पुढे ढकलण्यात आल्या आहे, मागच्या ७ वर्षापूर्वी क्रीडामंत्री रमेश तवडकर मंत्री असताना सावळवाडा पेडणे येथील मैदानाचा विकास करण्याचा आराखडा तयार केला होता. त्या आराखड्यात तत्कालीन क्रीडामंत्री रमेश तवडकर आणि तत्कालीन मंत्री राजेंद्र आर्लेकर आदींनी या मैदानाचा विकास करताना जलतरण तलाव उभारण्याचे आश्वासन दिले होते.
राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने का होईना शेवटी पेडणे तालुक्यासाठी सुसज्ज न भूतो न भविष्यति असा इनडोअर स्टेडियम मिळाले आहे. आमदार, मंत्री क्रीडामंत्री सरकार बदलतील, मात्र हे मैदान पेडणे तालुक्यात कायमस्वरूपी उपलब्ध झाले आहे.

क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता राष्ट्रीय खेळासाठी राज्यात ठिकठिकाणी करोडो रुपये खर्च करून मैदानाचा विकास साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून पेडणे सावळवाडा येथे इंडोअर स्टेडियम उभारलेले आहे. त्या मैदानाचा उद्‍घाटन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने करण्यात येईल. आता लवकरच जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार असून आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या मैदानाचे उद्‍घाटन होईल, असे त्यांनी सांगितले.

गोमेकॉ’ सोसायटीच्‍या ४५ भागधारकांचा सत्‍कार

संबंधित बातम्या