मुलांना कला, संस्‍कृतीची माहिती द्या

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजीः गुरुजन आणि पालकांनी आपल्या मुलाला बालपणापासूनच पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी मार्गदर्शन केले तर तो कोणत्या ना कोणत्या कलेत पारंगत होवू शकतो, असे प्रतिपादन सम्राट इंटरनॅशनल क्लबचे राज्य अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केले.

पणजीः गुरुजन आणि पालकांनी आपल्या मुलाला बालपणापासूनच पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी मार्गदर्शन केले तर तो कोणत्या ना कोणत्या कलेत पारंगत होवू शकतो, असे प्रतिपादन सम्राट इंटरनॅशनल क्लबचे राज्य अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केले.

पणजी सम्राट क्लबने आयोजित केलेल्या राज्य पातळीवर देशभक्तीपर समूह गान स्पर्धेच्या व्यासपिठावर प्रसाद नाईक प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. तसेच गौरीश धोंड, रोटरी क्लबचे विरेश नाडकर्णी, जायंट ग्रुप ऑफ पणजीचे राजेंद्र कामत, गोल्डन कलेक्शनचे शिवकुमार जोशी, कोंकर इव्हेंटचे उपेंद्र पै रायकर, क्लबचे अध्यक्ष भालचंद्र आमोणकर आणि सचिव रोहिदास नाईक उपस्थित होते. गौरीश धोंड यांनी विद्यार्थ्यांना संगीताबद्दलचे महत्त्‍व सांगितले.

"हा अर्थसंकल्प म्हणजे घर मोडून मांडव घालण्यासारखेच"

शिवकुमार जोशी म्हणाले की, मुलांनी बालवयातच चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. राज्‍यातील १६ माध्यमिक विद्यालयांनी स्पर्धेत भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी परिधान केलेली वेशभूषा अत्यंत आकर्षक व विविधतेचे दर्शन घडविणारी होती. स्पर्धेचा निकाल : प्रथम पारितोषिक सरकारी माध्यमिक विद्यालय, मोर्ले सत्तरी, द्वितीय एल. डी. सामंत, हायस्कूल म्हापसा व तृतीय बाल भारती विद्यामंदिर रायबंदर यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पिपल हायस्कूल पणजी व मुष्ठीफंड हायस्कूल पणजी यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण माजी प्राध्यापक व संगीत तज्‍ज्ञ तारानाथ होलेगडे व रशीता वर्णेकर यांनी केले. होते.

स्पर्धेच्या आयोजनासाठी विरेश नाडकर्णी, राजेंद्र कामत, शिवकुमार जोशी, उपेंद्र पै रायकर, कोंकर इव्हेंट्स पणजी तसेच श्री कुमार राजमाने, वैभव आर्टस पणजी यांचे मोलाचे योगदान लाभले. सूत्रनिवेदन पूजा केंकरे यांनी केले. सचिव रोहिदास नाईक यांनी आभार मानले.
 

संबंधित बातम्या